Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Joe Biden: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांची घोषणा, निर्वासितांना मिळणार अमेरिकेचे नागरिकत्व, कोणाला लाभ? काय अटी?
कोणाला लाभ? काय अटी?
– या निर्णयामुळे जवळपास पाच लाखांपेक्षा अधिक निर्वासितांना लाभ होऊ शकतो, असे प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केले अधोरेखित
– नागरिकत्व प्राप्त करण्यासाठी निर्वासिताने १७ जून, २०२४ रोजीपर्यंत किमान १० वर्षांपासून अमेरिकेत वास्तव्य केलेले असावे
– त्याचे अमेरिकी नागरिकाशी लग्न झालेले असावे
– अर्हताप्राप्त निर्वासिताचा अर्ज मंजूर झाला, तर त्याच्याकडे ग्रीन कार्डसाठी अर्ज करण्याकरीता तीन वर्षांचा कालावधी असेल
– त्याला किंवा तिला कामाचा हंगामी परवाना मिळेल
– यादरम्यान त्यांना हद्दपारीपासून संरक्षण मिळेल
५० हजार मुलांना लाभ
– आई-वडिलांपैकी एक अमेरिकी नागरिक असलेली सुमारे ५० हजार नागरिकत्व नसलेली मुले या प्रक्रियेसाठी पात्र ठरण्याची शक्यता
– दाम्पत्याच्या लग्नाला किती वर्षे झाली, हे विचारात घेतले जाणार नाही. परंतु १७ जून, २०२४नंतर लग्न केलेले यासाठी पात्र ठरणार नाहीत.
– या उन्हाळ्याच्या शेवटाला अर्ज सादर करण्याची प्रक्रिया सुरू होण्याचा अंदाज
– व्हाइट हाऊसमध्ये होणाऱ्या कार्यक्रमात मंगळवारी बायडेन त्यांच्या योजनेबद्दल बोलणार