Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

१२ लाख लोकांसाठी रोजगार उपलब्ध, ७६ हजार २०० कोटी रुपयांचा खर्च ; वाढवण बंदराला हिरवा झेंडा

10

वृत्तसंस्था, नवी दिल्ली : डहाणू तालुक्यातील वाढवण बंदरास बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. विरोध व समर्थनामध्ये हेलकावे खाणाऱ्या या प्रकल्पाचा मार्ग यामुळे मोकळा झाला आहे.वाढवण बंदराच्या उभारणीसाठी ७६,२०० कोटी रुपयांचा खर्च येणार असून, जवाहरलाल नेहरू पोर्ट ऑथोरिटी व महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाने स्थापन केलेल्या वाढवण पोर्ट प्रोजेक्ट लिमिटेडकडून या बंदराची उभारणी करण्यात येणार आहे. या कंपनीमध्ये ७४ टक्के भागीदारी ऑथोरिटीची व २६ टक्के भागीदारी बोर्डाची असेल. अत्याधुनिक सुविधांनी युक्त असलेले हे बंदर जगातील दहा बंदरांमध्ये गणले जाणार आहे. याद्वारे १२ लाख लोकांसाठी रोजगार उपलब्ध होणार असल्याची माहिती माहिती व प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. या बंदरात प्रत्येकी एक हजार मीटर लांबीचे नऊ कंटेनर टर्मिनल असतील. वाढवण बंदराचे नियोजन सुरू होताच त्यास स्थानिक व मच्छिमारांचा विरोध सुरू झाला आहे. मात्र, या बंदरामुळे पर्यावरणीय हानी होणार नाही, अशी ग्वाही वेळोवेळी ऑथोरिटीकडून देण्यात आली आहे.
Crop MSP Rate Increase : मोदी सरकारची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा, 14 पिकांच्या एमएसपी दरात केली मोठी वाढ

तांदळाच्या हमीभावात वाढ

केंद्रीय मंत्रिमंडळाने तांदळासह १४ खरीप पिकांच्या हमीभावात वर्ष २०२४-२५च्या हंगामासाठी वाढ करण्याचा निर्णयही घेतला. तांदळाच्या हमीभावात ५.३५ टक्के वाढ करून प्रतिक्विंटल २३०० रुपयांपर्यंत निश्चित करण्यात आला आहे. सरकारकडे तांदळाचा पाच कोटी ३४ लाख टन अतिरिक्त साठा असूनही महाराष्ट्र, हरयाणा, झारखंडमधील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. कृषी मूल्य व किंमत आयोगाच्या शिफारशींनुसार १४ खरीप पिकांचा हमीभावही जाहीर करण्यात आला. तांदळाच्या सामान्य श्रेणीचा हमीभाव ११७ रुपयांनी वाढवून प्रतिक्विंटल २३०० रुपये, तर अ दर्जाच्या तांदळाचा भाव २३२० रुपयांपर्यंत वाढवण्यात आला आहे. हमीभाव हा उत्पादन किंमतीच्या दीड पट अधिक असावा, या २०१८मधील धोरणानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.

वाराणसी विमानतळाच्या विकासासाठी २८६९ कोटी

वाराणसीतील लालबहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विस्तार करण्यात येणार असून, त्यासाठी २८६९ कोटी रुपये मंजूर करण्य़ात आले आहेत. नवी टर्मिनल इमारत, विमान पार्किंग भागाचे आणि धावपट्टीचे विस्तारीकरण तसेच समांतर टॅक्सी मार्गाचा या कामांमध्ये समावेश आहे. यानंतर सध्याच्या वार्षिक ३९ लाख प्रवाशांवरून ९९ लाख प्रवाशांपर्यंत क्षमतावाढ होणार आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.