Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Realme GT 6 5G: वनप्लसला भिडणार रियलमीचा 16GB RAM आणि AI फीचर्स असलेला फोन; लाँच झाला भारतात

14

Realme GT 6 5G अखेरीस भारतात लाँच झाला आहे. हा कंपनीचा लेटेस्ट फ्लॅगशिप स्मार्टफोन आहे, जो अनेक AI फीचर्ससह आला आहे. फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट असलेला FHD AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच, हा फोन Snapdragon 8s Gen 3 प्रोसेसरसह आला आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 50MP चा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फी व व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 32MP चा फ्रंट कॅमेरा मिळतो.

Realme GT 6 5Gची किंमत

कंपनीनं Realme GT 6 5G फोन तीन व्हेरिएंट्समध्ये सादर केला आहे. फोनच्या 8GB RAM + 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 35,999 रुपये आहे. बँक कार्डच्या माध्यमातून फोनवर 4000 रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. तसेच, 12GB RAM + 256GB स्टोरेजची किंमत 38999 रुपये आहे. याच्या 16GB RAM + 512GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 44,999 रुपये आहे. हा डिस्काउंट नंतर 39,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. हा फोन Fluid Silver आणि Razor Green कलर ऑप्शनमध्ये आला आहे. फोनची विक्री Amazon वर 25 जूनपासून सुरु होईल. ऑफर पाहता, ICICI बँक कार्डच्या माध्यमातून फोनवर 2000 रुपयांचा डिस्काउंट मिळेल.
OnePlus 12R घ्यावा की नवीन Xiaomi 14 CIVI; जाणून घ्या कोणता फोन देतो पैसा वसूल फीचर्स

Realme GT 6 5Gचे स्पेसिफिकेशन्स

Realme GT 6 5G स्मार्टफोनमध्ये 6.78 इंचाचा FHD AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz आणि रिजोल्यूशन 270×1264 पिक्सल आहे. डिस्प्लेमध्ये 6000 nits ब्राइटनेस देण्यात आली आहे. हा फोन Snapdragon 8s Gen 3 प्रोसेसरसह आला आहे.

फोटोग्राफी व व्हिडीओसाठी रियलमीच्या या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या सेटअपमध्ये 50MP Sony LYT-808 प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. यात OIS सपोर्ट मिळतो. त्याचबरोबर 50MP ची टेलीफोटो लेन्स देण्यात आली आहे. तसेच, तिसरा 8MP चा अल्ट्रा-वाइड सेन्सर आहे. सेल्फी व व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 32MP चा फ्रंट कॅमेरा मिळतो.

फोनची बॅटरी 5500mAh ची आहे, त्याचबरोबर तुम्हाला 120W SuperVooc फास्ट चार्जिंगचा सपोर्ट आहे. कंपनीचा दावा आहे की फोन 26 मिनिटांच्या चार्जवर 1.90 दिवस वापरता येईल इतकी पावर देतो. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये वाय-फाय 6, NFC, ब्लूटूथ 5.4 व ड्युअल बँड जीपीएस सपोर्ट देण्यात आला आहे. हा फोन Android 14 आधारित Realme UI 5.0 वर चालतो.

Next Ai

फोनमध्ये Ai Imaging, Ai Efficiency आणि Ai Personalization असे Next Ai फीचर्स मिळतात. तसेच Ai Night Vision Mode मिळतो, जो रात्रीच्या अंधारात देखील चांगले क्वॉलिटी फोटो व व्हिडीओ क्लिक करू देतो. Ai Smart Image Matting फीचरमध्ये गुगल फोटोच्या माध्यमातून फोटो स्टोरेज व एडिटिंग सुविधा मिळते. गुगल फोटो युजर्सना मॅजिक एडिटर, ब्लर, इरेजर सारखे टूल मिळतात.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.