Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
पहिले कारण
तिसऱ्यांदा पीएम पदाची शपथ घेतल्यानंतर मोदींचा पहिलाच जम्मू काश्मीर दौरा आहे. यावर्षी योगाची थीम ‘योगा स्वत:साठी आणि समाजासाठी’ अशी ठेवली आहे. पुढील वर्षी जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका आहे अशातच मोदींच्या जम्मू – काश्मीर दौऱ्यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांना नवी उमेद आणि संघटनेला बळकटीकरण देण्याचा मुख्य हेतू पीएम मोदींचा असण्याची शक्यता वर्तवली जाते.
दुसरे कारण
लोकसभा निवडणुकीतील विजय, जम्मू काश्मीरमध्ये मोदींच्या नेतृत्वात पक्षाला चांगले यश मिळाले. पण काश्मीर खोऱ्यातील लोकसभेच्या तीन जागांवर उमेदवार उभे न केल्यामुळे भाजपला टीकेचा सामना करावा लागला, कधीकधी “मोठे ध्येय साध्य करण्यासाठी निर्णय घेतले जातात” आणि भाजप “देशभक्त” पक्षांना पाठिंबा देत आहे, असे जम्मू आणि काश्मीर भाजपचे प्रमुख रविंदर रैना म्हणाले. अनंतनाग-राजौरी, श्रीनगर आणि बारामुल्ला या तीन जागांवर भाजपने उमेदवार दिला नाही आता हीच बाब भाजपच्या स्थानिक नेतृत्व आणि कार्यकर्त्यांना खटकले त्यामुळे मोदींचा दौरा काश्मीरच्या कार्यकर्त्यांची नाराजगी दूर करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतोय.
तिसरे कारण
पीएम मोदींचे सरकार स्थापन झाल्यापासून जम्मू काश्मीरमध्ये तीन मोठे दहशतवादी हल्ले झालेत यामुळे विरोधकांनी सरकारला घेरले होते. यासह एनडीएचे सरकार जास्त काळ चालणार नाही असे म्हणत विरोधकांनी टीकेची झोड उठवली. याच कारणांसाठी मोदींच्या जम्मू काश्मीरमधील दौऱ्यातून सरकारची असलेली स्थिरता यासह जम्मू काश्मीरमध्ये शांततापूर्ण वातावरण आहे असा संदेश देण्याचा हेतू मोदींच्या दौऱ्यामागे दिसतोय. योगा दिनी केलेल्या भाषणातून त्यांचे तसे स्पष्ट संकेत आढळून येतात.
गेल्या दहा वर्षात प्रत्येक योगा दिनी पीएम मोदी वेगवेगळ्या ठिकाणी योगा करताना पाहायला मिळाले. पहिला योगा दिन २०१५ साली दिल्लीत हजारो लोकांच्या उपस्थितीत पार पाडला. ज्यावेळी पहिल्यांदा भारतीयांना योगाबद्दल पुन्हा कुतुहूल निर्माण झाले. दुसरा योगा दिन २०१६ साली चंदीगड मध्ये तीस हजार लोकांच्या उपस्थिती पार पडला. तिसरा योगा दिन २०१७ साली लखनऊत पार पडला. चौथा योगा दिन २०१८ साली देहारुदून मध्ये पार पडला. पाचवा योगा दिन २०१९ साली झारखंडमधल्या रांची मध्ये पार पडला. सहावा आणि सातवा योगा दिन २०२० आणि २०२१ दरम्यान कोविड काळामुळे योगा दिन ऑनलाईन करत भारतवासीयांना ‘आरोग्यासाठी योगा’ हा मॅसेज देत योगाचे महत्त्व समजावले. आठवा योगा दिन २०२२ मध्ये मैसुर पॅलेसमध्ये साजरा करताना दिसले तर नववा योगा दिन २०२३ मध्ये जागतिक पातळीवर युएस मध्ये मोदींसोबत अनेक एनआरए सुद्धा करताना पाहायला मिळाले आणि जागतिक स्तरावर मोदींच्या योगाचे कौतुक सुद्धा झालेले.