Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Sanjay Raut: ‘बंद मेंं कभी कभी ऐसा हो जाता है’; संजय राऊत यांची ‘महाराष्ट्र बंद’बाबत प्रतिक्रिया

17

हायलाइट्स:

  • महाराष्ट्र बंद शंभर टक्के यशस्वी झाला- खासदार संजय राऊत.
  • ‘बंद में कभी कभी ऐसा हो जाता है’, बंदमधील हिंसक घटनांवर राऊत यांची प्रतिक्रिया.
  • शेतकऱ्यांच्या रक्ताचा अपमान करणाऱ्यांवर जर हात जोडणाऱ्यांचा हात सुटला असेल, तर ते आंदोलन आहे- राऊत.

मुंबई: लखीमपूर खेरी हिंसाचाराचा (Lakhimpur Kheri Violence) निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीने (Maha Vikas Aghadi) आज महाराष्ट्र बंद (Maharashtra Bandh) पाळला. काही ठिकाणी लोकांनी स्वत:हून बंद पाळल्याचे दिसले, तर काही ठिकाणी हिंसक किंवा वादाच्या घटनाही पाहायला मिळाल्या. एकूणच आजच्या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. मात्र, आजचा बंद हा १०० टक्के यशस्वी झाल्याचा दावा शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटले आहे. बंदमधील हिंसक घटनांवर बोलताना राऊत यांनी शेतकऱ्यांच्या रक्ताचा अपमान करणाऱ्यांवर जर का हात जोडणाऱ्यांचा हात सुटला असेल, तर ते आंदोलन आहे, असे सांगत, ‘बंद में कभी कभी ऐसा हो जाता है’, अशी टिप्पणी केली. (Shiv Sena MP Sanjay Raut has said that Maharashtra Bandh was one hundred percent successful)

बंदबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना राऊत म्हणाले की, महाविकास आघाडीने पुकारलेला आजचा महाराष्ट्र बंद शंभर टक्के यशस्वी झाला आहे. या बंदचा मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जबरदस्त प्रभाव होता. या बंदमध्ये लोक स्वत:हून सहभागी झाले होते, असे सांगतानाच काही ठिकाणी बाचाबाची झाली, वाद झाल्याचे त्यांनी मान्य केले.

क्लिक करा आणि वाचा- राज्याला आज मोठाच दिलासा! करोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत दीड वर्षानंतर पहिल्यांदाच इतकी मोठी घट

आंदोलनांमध्ये अशा प्रकारच्या घटना नेहमी होत असतात, असे सांगतानाच असे बंद यापूर्वी अनेकांनी केलेले आहेत. भाजपनेही बंद केले नाही का पूर्वी? बंद हे अशाच पद्धतीनेच केले जातात, असे राऊत म्हणाले. काही लोकांना हा बंद कशासाठी पुकारला गेला हेच कळत नाही. असे लोक नतदृष्ट असतात. आजचा महाराष्ट्र बंद हा काही राजकीय बंद नव्हता. राजकीय स्वार्थासाठी बंद नव्हता किंवा एखाद्या पक्षाला फायदा व्हावा म्हणून पुकारलेला हा बंद नव्हता, असेही ते पुढे म्हणाले.

क्लिक करा आणि वाचा- प्रवीण दरेकरांचा मलिकांवर हल्लाबोल; जावयाचे ड्रगप्रकरण काढत म्हणाले…

‘बंद में कभी कभी ऐसा हो जाता है’

बंदवर प्रतिक्रिया देत असताना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी राऊत यांना राज्यभरात झालेले वाद आणि हिंसक घटनांबाबत विचारले. यावेळी बंद पाळण्यासाठी दमदाटी करणे किंवा ठाण्यात शिवसैनिकांकडून ऑटो रिक्षा चालकांना मारहाण केल्याची घटनांचा उल्लेख करण्यात आला. त्यावर प्रतिक्रिया देताना राऊत म्हणाले की, शेतकऱ्यांच्या रक्ताचा अपमान करणाऱ्यांवर जर हात जोडणाऱ्यांचा हात सुटला असेल, तर ते आंदोलन आहे. जसे आपले एक गाणे आहे की, प्यार मे कभी कभी ऐसा होता है, तसेच ‘बंद मै कभी कभी ऐसा हो जाता है’ असे राऊत म्हणाले.

क्लिक करा आणि वाचा- दोन दिवस पुरेल एवढाच कोळसा, ऊर्जा राज्यमंत्री म्हणाले…

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.