Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Redmi 13 5G: 108 एमपीच्या कॅमेऱ्यासह येतोय Redmi चा नवीन स्वस्त 5G फोन; लाँच डेट आली समोर

10

Redmi पुढील महिन्यात देशात Redmi 13 5G लाँच करेल. गेल्यावर्षी आलेल्या Redmi 12 5G ची जागा घेण्यासाठी कंपनी हा मॉडेल लाँच करत आहे. या स्मार्टफोनच्या डिजाइन आणि प्रमुख स्पेसिफिकेशन्सचा कंपनीनं खुलासा केला आहे. यात फ्लॅट डिस्प्ले देण्यात आला आहे.

Redmi इंडियानं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक पोस्टमध्ये सांगितलं आहे की Redmi 13 5G 9 जुलैला लाँच केला जाईल. या स्मार्टफोनसाठी Xiaomi च्या वेबसाइटवर एक मायक्रोसाइट लाइव्ह करण्यात आली आहे. यात हा फ्लॅट डिस्प्ले आणि थिक बेजल्ससह दिसत आहे. यात फ्रंट कॅमेऱ्यासाठी टॉपवर होल-पंच स्लॉट आहेत. याच्या उजव्या कोपऱ्यात वॉल्यूम रॉकर आणि पावर बटन देण्यात आले आहेत. तर मागे ड्युअल रियर कॅमेरा सेटअपसह ग्लास फिनिश आहे. याचे दोन कॅमेरा आणि एक LED फ्लॅश युनिट उजव्या कोपऱ्यात देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन पिंक आणि ब्लू कलर्समध्ये येऊ शकतो.
Redmi 12 5G: 40 लाख लोकांनी खरेदी केला हा 10 हजारांच्या आत येणारा 5G Phone; जाणून घ्या फीचर्स

Redmi 13 5G मध्ये 108 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा असेल. यात प्रोसेसिंगसाठी क्वॉलकॉमचा Snapdragon 4 Gen 2 दिला जाईल. हा अँड्रॉइड 14 आधारित HyperOS वर चालेल. या स्मार्टफोनची 5,030mAh ची बॅटरी 33W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येईल. Redmi 13 4G या महिन्याच्या सुरुवातीला युरोपात सादर करण्यात आला होता.

Redmi नं यावर्षीच्या सुरुवातीला देशात Note 13 Pro 5G सीरीज लाँच केली होती. या सीरीजमध्ये Redmi Note 13 5G, Note 13 Pro 5G आणि Note 13 Pro+ 5G चा समावेश आहेत. या सीरीजच्या प्रो व्हर्जनमध्ये प्रोसेसर म्हणून क्वॉलकॉमचा Snapdragon 7s Gen 2 चिपसेट देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन एक नवीन कलरमध्ये सादर केला जाऊ शकतो.

अलीकडेच टिप्सटर Sudhanshu (@Sudhanshu1414) नं सांगितले होते की हा स्मार्टफोन नवीन ग्रीन कलरमध्ये येऊ शकतो. कंपनीनं Note 13 Pro 5G Arctic White, Coral Purple आणि Midnight Black कलर्समध्ये उपलब्ध केला होता. याचे स्पेसिफिकेशन्स बदलेले जाणार नाहीत. कंपनी या सीरीजचे इतर स्मार्टफोन देखील नवीन कलरमध्ये सादर करेल की नाही हे मात्र स्पष्ट झालं नाही.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.