Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

कर्जाचा बहाणा, घरी बोलावून शरीर संबंध, मग खेळ सुरु; सात वर्षात ४.३९ कोटी रुपये लुटले

10

ठाणे: ठाण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे एका ४५ वर्षीय महिलेने सहकारी बँकेच्या निवृत्त सीईओला बदनाम करण्याच्या आणि बलात्काराची तक्रार दाखल करण्याची धमकी देत त्यांच्याकडून तब्बल ४.३९ कोटी रुपये उकळले आहेत. या प्रकरणात तिला अटक करण्यात आली आहे. नवी मुंबईतील ६६ वर्षीय पीडित २०१६ मध्ये पहिल्यांदा या महिलेला भेटले होते. ही महिला त्यांच्या वडाळा येथील शाखेत आली असताना त्यांची भेट झाली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेने सुरुवातीला निवृत्त सीईओशी संपर्क केला आणि तिला आर्थिक अडचण असून कर्जाची गरज असल्याचं सांगितलं. कर्ज देण्याच्या प्रक्रियेदरम्यान तिच्याकडील कागदपक्ष हे पूर्ण नसल्याचं दिसून आलं. तसेच, कोपरी येथील आनंद नगर भागातील तिच्या घराचंही सर्वेक्षण करायचं होतं. २०१७ मध्ये जेव्हा पीडित कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी तिच्या घरी गेले, तेव्हा महिलेने त्यांना तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी मजबूर केलं. त्यानंतर तिला ७,३०० रुपयांच्या इएमआयसह ३ लाख रुपयांचं कर्ज देण्यात आलं.

८ रुपयांची मागणी, १०८ हप्त्यात ४.३९ कोटी लुटले

महिनाभरानंतर महिलेने पीडित व्यक्तीला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. जर तिला ८ कोटी रुपये दिले नाही तर ती पीडित व्यक्तीच्या कुटुंबाला आणि सहकर्मचाऱ्यांना व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवलेले न्यूज फोटोज दाखवेल, अशी धमकी तिने दिली. सुरुवातीला महिलेच्या धमकीला घाबरुन पीडित व्यक्तीने तिला ५ लाख रुपये दिले. २०१७ ते २०२३ या कालावधीदरम्यान त्यांनी १०८ वेळा तिला पैसे दिले. त्यांनी आरोपी महिलेला तब्बल ४.३९ कोटी रुपये दिले. यासाठी त्यांनी आपला फ्लॅट विकला, पीएफमधून पैसे काढले आणि अनेकांकडून कर्जही घेतलं.

इतके पैसे दिल्यावरही महिलेने त्यांना ब्लॅकमेल करणं थांबवलं नाही. अखेर या त्रासाला कंटाळून पीडित व्यक्तीने पोलिसांशी संपर्क करत याची तक्रार दिली. त्यानंतर जेव्हा आरोपी महिलेने पीडित व्यक्तीकडे ५ लाख रुपयांची मागणी केली तेव्हा त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली आणि पोलिसांनी सापळा रचला. पाच लाखांवरुन महिलेला १ लाखापर्यंत आणलं. जेव्हा ती १ लाख रुपये घेण्यासाठी आली तेव्हा पोलिसांनी तिला रंगहाथ अटक केली. सध्या पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहे. तसेच, पैशांच्या स्त्रोताचाही शोध घेतला जात आहे, जेणेकरुन पीडित व्यक्तीकडून उकळेले पैसे कुठे गुंतवण्यात आले याची माहिती मिळेल. तसेच, या प्रकरणात महिलेसोबत आणखी कोणी सहभागी आहे का याचाही तपास केला जात आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.