Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
OnePlus India नं आपल्या ऑफिशियल X (Twitter) हँडलच्या माध्यमातून OnePlus Nord CE4 Lite 5G स्मार्टफोनची लाँच डेट कंफर्म केली आहे. हा फोन 24 जून संध्याकाळी 7 वाजता लाँच केला जाईल. या पोस्टरमध्ये फोन ब्लू कलर ऑप्शनमध्ये दिसत आहे. डिजाइन पाहता, फोनच्या बॅक पॅनलवर कॅप्सूल कॅमेरा मॉड्यूल दिसत आहे, ज्यात ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. रियर कॅमेराच्या खाली LED फ्लॅशला जागा देण्यात आली आहे.वर सांगितल्याप्रमाणे याआधी कंपनीनं घोषणा केली होती की 18 जून संध्याकाळी 7 वाजता कंपनी नवीन फोन घेऊन येत आहे. त्यामुळे OnePlus Nord CE4 Lite 5G फोनसाठी आता ग्राहकांना अजून काही काळ वाट पाहावी लागणार आहे.
OnePlus Nord CE4 Lite 5G चे लीक फीचर्स
OnePlus Nord CE4 Lite 5G चे लीक फीचर्स पाहता, हा फोन 6.67 इंच डिस्प्लेसह येऊ शकतो. डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz असेल. तसेच, फोन Qualcomm’s Snapdragon 6 Gen 1 प्रोसेसरसह येईल. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप दिला जाईल. ज्यात 50MP चा प्रायमरी कॅमेरा आणि 2MP चा डेप्थ सेन्सर असू शकतो. सेल्फी व व्हिडीओ कॉलिंगसाठी 16MP चा फ्रंट कॅमेरा मिळण्याची शक्यता आहे. फोनमध्ये 5,500mAh ची बॅटरी असू शकते. किंमतीची माहिती लाँचच्या वेळीच समोर येईल.