Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

समीर वानखेडे आणखी सहा महिने एनसीबीच्या विभागीय संचालकपदी

6

हायलाइट्स:

  • समीर वानखेडे यांना सहा महिन्यांची मुदतवाढ
  • पुढील सहा महिने संचालकपदी कायम
  • आर्यन खान प्रकरणात आले होते चर्चेत

मुंबईः सुशांतसिंह राजपूतच्या (sushant singh rajput) आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील ड्रग्जविरोधी कारवायांचा धडाका सुरू झाल्यापासून समीर वानखेडे (sameer wankhede) हे नाव चर्चेत आलं आहे. समीर वानखेडे हे एनसीबीच्या मुंबई कार्यालयात प्रादेशिक संचालक आहेत. समीर वानखेडे यांना एनसीबीच्या संचालकपदी आणखी सहा महिन्यांची मुदतवाढ मिळाली आहे.

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला ताब्यात घेतल्यानंतर समीर वानखेडे या नावाचीच सध्या चर्चा आहे. २ ऑक्टोबर रोजी कोर्डेला नावाच्या क्रुझवर अमली पदार्थांसह पार्टी आयोजित केली होती. या जहाजात अमली पदार्थांसह पार्टी आयोजित होणार असल्याची माहिती ‘एनसीबी’ला मिळाली होती. त्यानुसार ‘एनसीबी’ने अधिकारी प्रादेशिक संचालक समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात जहाजावर कारवाई केली होती. समीर वानखेडेंच्या नेतृत्वात झालेल्या या कारवाईमुळं मोठं राजकीय वादळही उठलं होतं.

वाचाः समीर वानखेडे-मोहित कंबोज यांची भेट?; नवाब मलिक करणार मोठा गौप्यस्फोट

समीर वानखेडे यांची सप्टेंबर २०२०मध्ये महसूल गुप्तचर संचालनालयातून नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरोमध्ये बदली झाली होती. त्यानंतर आता त्यांना संचालकपदी सहा महिन्यांची मुदतवाढ मिळाली आहे. एनसीबीच्या प्रादेशिक संचालकपदी पुढील सहा महिने वानखेडे कायम राहणार आहेत. याआधीही समीर वानखेडे यांना एकदा मुदतवाढ मिळाली होती.

कोण आहेत समीर वानखेडे?

समीर वानखेडे हे २००८ च्या बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत. याआधी ते मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल उपायुक्त म्हणून कार्यरत होते. त्यानंतर त्यांची बदली आंध्र प्रदेश आणि दिल्लीत करण्यात आली होती.

वाचाः कोळसाटंचाईचे संकट, पण कोयना प्रकल्पामुळे महाराष्ट्र प्रकाशात

समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली आतापर्यंत २ हजाराहून अधिक लोकांवर अमली पदार्थांविरोधी गुन्हे दाखल केले आहेत. तर, जवळपास १७ कोटींहून अधिक रुपयांचे ड्रग्ज जप्त केलं आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणाला जोडूनच तपास सुरू असणाऱ्या ड्रग्ज प्रकरणी तपास आणि कारवाई दरम्यान वानखेडे प्रकाशझोतात आले होते. त्यांच्या हाती महत्त्वाची जबाबदारी सोपवल्यानंतर बॉलिवूडचं ड्रग्ज कनेक्शन उघडकीस आलं होतं

वाचाः ‘कुणीतरी माझ्यावर पाळत ठेवत आहे’; समीर वानखेडेंचा गंभीर आरोप

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.