Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

UG NEET EXAM 2024 : काय सांगता? NEET परीक्षा सुरू असताना १८६ केंद्रांवरील सीसीटीव्ही कॅमेरे होते बंद, अहवाल आला समोर

10

नवी दिल्ली : दरवर्षी प्रमाणे वैद्यकीय क्षेत्रात पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी (5 जून) रोजी नॅशनल टेस्टिंग एजन्सीने ‘नीट’ परीक्षेचे आयोजन केलं होतं. देशभरातून लाखों विद्यार्थी या परीक्षेसाठी या परीक्षेसाठी बसले होते. या परीक्षेचा निकाल लागला असून परीक्षेत गैरप्रकार झाला असल्याचं आरोप विद्यार्थी आणि पालकांनी केला आहे. सर्वोच्च न्यायालयात याबाबतची सुनावणी पार पडली असून सीबीआयला चौकशी करण्याचे आदेश आले आहेत. अशातच आता त्रयस्थ या संस्थेने एक अहवाल सादर केला. त्यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे.

अहवालात काय म्हंटलंय ?

‘त्रयस्थ’ या सर्वे करणाऱ्या संस्थेने विविध राज्यातील 399 परीक्षा केंद्रांना भेट दिली. ४६ टक्के म्हणजेच १८६ केंद्रे अशी होती जिथे दोन सीसीटीव्ही कॅमेरे नव्हते. केंद्रांवर जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार दोन सीसीटीव्ही असणे बंधनकारक होते. या कॅमेऱ्यांचे लाईव्ह फीड नवी दिल्लीतील एनटी मुख्यालयातील केंद्रीय नियंत्रण कक्षाला पाठवले जाणार होते. परंतु तसे झाले नाही असं अहवालात सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर 399 पैकी 68 केंद्रांवर म्हणजे सुमारे 16% स्ट्राँग रूमसाठी गार्ड तैनात नव्हते.
Hit And Run: दहा चाकी ट्रकने ज्येष्ठाला चिरडलं; शिर १ किमी दूर सापडलं; चौकशीत धक्कादायक माहिती उघड

सर्वेक्षणाचा उद्देश काय होता ?

परीक्षेच्या दिवशी केंद्रांवर विहित मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले जात आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी सर्वेक्षण करण्यात आले होते. यासाठी सुमारे 4 हजार परीक्षा केंद्रांपैकी १९९ परीक्षा केंद्रांची तपासणी करण्यात आली. तपासणीसाठी, पर्यवेक्षकांकडे तपशीलवार चेकलिस्ट असते. उदाहरणार्थ, परीक्षा केंद्रांवर शारीरिक नियंत्रणांची संपूर्ण तपासणी, जॅमर कार्यरत आहेत की नाही, सुरक्षा व्यवस्था योग्य प्रकारे केली गेली आहे की नाही, परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचणे किती सोपे आहे, इ. परीक्षेदरम्यान केंद्रांवर आसनव्यवस्था, निरीक्षकांची संख्या, सीसीटीव्ही हाताळण्यासाठी कर्मचारी आहेत की नाही, या सर्व बाबी तपासण्यात आल्या आहेत.

दरम्यान, नीट परीक्षेचा गोंधळ सुरू असतानाच युजी नेट ही परीक्षा देखील रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.