Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Motorola Razr 50 Ultra लवकरच होईल भारतात लाँच, Amazonच्या माध्यमातून होईल विक्री

10

Motorola सध्या भारतीय बाजारात मोठयाप्रमाणात सक्रिय झाली आहे. कंपनी एका मागून एक स्मार्टफोन सादर करत आहे. मग ते बजेट सेगमेंटयामध्ये असो किंवा मिडरेंज असो किंवा फ्लॅगशिपमध्ये. आता कंपनीच्या फ्लिप फोनची देखील बातमी आली आहे. कंपनी आपला Razr 50 Ultra चीनमध्ये लाँच करणार आहे. हा क्लॅमशेल-स्टाइल फोल्डेबल स्मार्टफोन भारतात देखील लवकरच सादर केला जाईल. कंपनीनं यातील आर्टफिशियल इंटेलिजेंस (AI) संबंधित फीचर्सची माहिती दिली आहे.

ई-कॉमर्स साइट Amazon वर या स्मार्टफोनसाठी एक मायक्रोसाइट लाइव्ह झाली आहे. Motorola Razr 50 Ultra मध्ये अ‍ॅडॅपटिव्ह स्टॅबिलायजेशन, अ‍ॅक्शन शॉट, इंटेलिजंट ऑटो फोकस ट्रॅकिंग, फोटो एन्हान्समेंट प्रो, सुपर झूम, कलर ऑप्टिमाइजेशन, स्टाइल सिंक आणि AI मॅजिक कॅनव्हास सारखे अनेक AI फीचर्स दिले जातील.

या मायक्रोसाइटवर कंटेंट आगामी फोल्डेबल स्मार्टफोन संबधित नाही परंतु हा इलेक्ट्रॉनिक्स कॅटेगरीमध्ये ‘Motorola Razr 50 Ultra’ अंतगर्त देण्यात आला आहे. तसेच टेक्स्ट सर्च बारसह देण्यात आलेल्या पेजच्या वर देखील दाखवण्यात आला आहे. यावरून असा अंदाज लावला जात आहे की आगामी Razr फोल्डेबल स्मार्टफोन देशात लवकरच लाँच होऊ शकतो आणि याची विक्री अ‍ॅमेजॉनच्या माध्यमातून केली जाईल.Moto S50 Neo: 4 वर्षांची वॉरंटी असलेला फोन येतोय, पुढील आठवड्यात होऊ शकतो बाजारात लाँच

मोटोरोलानं सांगितलं आहे की Razr 50 Ultra 25 जूनला चीनमध्ये लाँच केला जाईल. त्यानंतर हा भारतात येईल. अलीकडेच टिप्सटर Steve Hemmerstoffer (@onleaks) नं Motorola Razr 50 Ultra चे स्पेसिफिकेशन्स आणि प्राइसिंग लीक केली होती. याचा 12GB RAM आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 999 युरो (जवळपास 83,000 रुपये) असू शकते. गेल्यावर्षी सादर करण्यात आलेल्या Razr 40 Ultra ची किंमत देखील इतकीच होती. हा स्मार्टफोन मिडनाइट ब्लू, हॉट पिंक आणि स्प्रिंग ग्रीन कलर्समध्ये उपलब्ध केला जाऊ शकतो. यात 6.9 इंच (1,080 x 2,640 पिक्सल) OLED डिस्प्ले आणि 3.6 इंचाचा कव्हर डिस्प्ले असू शकतो.

या स्मार्टफोनमध्ये प्रोसेसर म्हणून Snapdragon 8s Gen 3 असू शकतो. यात 12GB चा RAM आणि 256GB स्टोरेज मिळू शकते. यातील ड्युअल रियर कॅमेरा सेटअपमध्ये 50 मेगापिक्सलचा कॅमेरा असू शकतो. याच्या फ्रंटला सेल्फी आणि व्हिडीओ कॉलसाठी 32 मेगापिक्सलचा कॅमेरा दिला जाऊ शकतो. Motorola Razr 50 Ultra मध्ये 4,000mAh ची बॅटरी USB Type-C चार्जिंग सपोर्टसह मिळू शकते. यात सिक्योरिटीसाठी फिंगरप्रिंट सेन्सर दिला जाऊ शकतो.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.