Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Viral Video Of School Bus : तुमची मुलं स्कुल व्हॅननं जातात? मग सतर्क व्हा! हा बेजबाबदारपणा पाहाच

7

Gujrat Viral Video : गुजरातमध्ये हल्लीच प्ले झोनमध्ये लहानग्यांनी जीव गमावला. यानंतर सोशल मिडीयावर आणखी एक व्हिडिओ व्हायरल होतोय. वडोदरातून एक घाबरवणारी घटना समोर आली आहे. खासगी शाळेच्या धावत्या स्कूलबस मधून दोन विद्यार्थीं पडल्यात, लोकांनी घटना पाहून आरडाओरडा सुरु केली. विद्यार्थ्यांनी गोंधळ करायला सुरुवात केल्यावर बसचालकाने बस थांबवली. सीसीटीव्हीमध्ये घटनेचा संपूर्ण व्हिडिओ कैद झाला त्यामुळे शालेय पालकांचा काळजाचा ठोका चुकला.

चालक नसलेली रिक्षा गोल गोल फिरली, लोकांवर चढली; कोल्हापुरात विचित्र अपघात, CCTV फुटेज समोर

वडोदरातील व्हायरल व्हिडिओवर शाळेने सुद्धा दखल घेतलीय. तरसाली रोडवर तुलसी श्याम सोसायटीनजीक हा अपघात घडलाय. बसचालक प्रतीक परमार याला शाळेने नोकरीवरुन काढून टाकले आहे. विद्यार्थी शाळेतून परत येत असताना अचानक बसचा दरवाजा उघडला आणि दोन विद्यार्थी बसमधून बाहेर पडल्या. जवळपास असलेल्या लोकांनी विद्यार्थींनींना मदत करत त्यांचावर उपचार करत त्यांना घरी पाठवले.विद्यार्थींनीचे नाव मनाली आणि केशवी असल्याचे समोर आले आहे.

हा व्हिडिओ वडोदरामधील रिहाइशी परिसरातील आहे. गुजरातमध्ये याआधीसुद्धा शालेय बस चालकांच्या अनेक तक्रारी पालकांनी समोर आणल्या होत्या.गुजरात सरकारने याविरोधात कडक कायदे सुद्धा आणले होते. ज्यामध्ये बसचालकांसाठी एक कडक नियामवली सुद्धा करण्यात आली आहे. तरीसुद्धा हा प्रकार झाल्याने देशभरातली पालकांच्या चिंतेत भर पडले. शिक्षणमंत्री प्रफुल्ल पानशेरिया यांनी घटनेची दखल घेतली. सदर घटनेला गंभीर बाब म्हणत पालकांनी आधी बस स्कूलमधून पाठवण्याआधी सगळी चौकशी करावी, यासह चालक कसा आहे याची पडताळणी करुन घ्यावी. विद्यार्थ्यांची काळजी अतिशय महत्त्वाचा विषय आहे बसचालकाला सुद्धा याचे भान असले पाहिजे असे शिक्षणमंत्री पानशेरिया म्हणाले.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.