Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

iQOO Z9 Discount: डिस्काउंट मिळवण्यासाठी उरले फक्त काही दिवस; अशी आहे आयकू फोनची डील

11

iQOO Z9 यावर्षी एप्रिलमध्ये लाँच करण्यात आला होता आणि आता या स्वस्त 5G स्मार्टफोनवर कंपनी जबरदस्त डील देत आहे. स्मार्टफोनवर 3,000 रुपये पर्यंतचा डिस्काउंट आणि इतर काही ऑफर्स मिळवता येतील. iQOO Z9 मध्ये 1,800 nits पर्यंत पीक ब्राइटनेस लेव्हल आणि 120Hz पर्यंत रिफ्रेश रेटचा सपोर्ट असलेला AMOLED डिस्प्ले मिळतो. स्मार्टफोन MediaTek Dimensity 7200 5G चिपसेटवर चालतो. यात 6,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. तसेच धूळ आणि पाण्यापासून काही प्रमाणात सुरक्षा मिळवण्यासाठी IP54 रेटिंग आहे. चला जाणून घेऊया iQOO Z9 स्मार्टफोनवरील डिस्काउंट.

iQOO Z9 वरील डिस्काउंट

iQOO Z9 स्मार्टफोन कंपनीच्या अधिकृत वेबसाइट आणि Amazon वर 19,999 रुपयांमध्ये लिस्ट करण्यात आला आहे, ज्यात 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज मिळते. याच्या 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज मॉडेलची लाँच प्राइस 21,999 रुपये आहे. ग्राहकांनी हा स्मार्टफोन ICICI बँक किंवा HDFC बँकेच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डच्या माध्यमातून खरेदी केला तर त्यांना 3,000 रुपयांचा डिस्काउंट मिळेल.
iQOO 13 मध्ये असेल 100X झूम कॅमेरा, Snapdragon 8 Gen 4 प्रोसेसर! लाँच पूर्वीच खुलासा

ही ऑफर दोन्ही व्हेरिएंट्सवर लागू आहे आणि फुल स्वाइप व क्रेडिट कार्ड EMI ट्रँजॅक्शनवर देखील उपलब्ध आहे. iQOO च्या अधिकृत वेबसाइटनुसार ही ऑफर 24 जून ते 27 जून दरम्यान वैध आहे. iQOO Z9 ब्रश्ड ग्रीन आणि ग्राफीन ब्लू कलर ऑप्शनमध्ये सादर करण्यात आला आहे.

iQOO Z9चे स्पेसिफिकेशन्स

iQOO Z9 मध्ये 6.78-इंचाचा AMOLED डिस्प्ले आहे, ज्यात 1080 x 2400 पिक्सल रिजॉल्यूशन, 1,800 nits पीक ब्राइटनेस लेव्हल आणि 120Hz रिफ्रेश रेट आहे. फोन IP54 सर्टिफाइड डस्ट अँड वॉटर रेजिस्टंट आहे. Z9 मध्ये 50-मेगापिक्सलचा मेन सेन्सर आणि 2-मेगापिक्सलच्या डेप्थ लेन्स सह एक ड्युअल रियर सेटअप मिळतो. सेल्फीसाठी यात 16-मेगापिक्सलचा सेन्सर आहे.

iQOO Z9 मध्ये Snapdragon 7 Gen 3 चिप मिळते, त्याचबरोबर 8GB रॅम आणि 256GB पर्यंत स्टोरेज जोडण्यात आली आहे. फोनमध्ये मोठी 5,000mAh ची बॅटरी मिळते, जी 44W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. हा फोन Android 14 आधारित OriginOS 4 वर चालतो. फोनमध्ये ड्युअल स्टीरियो स्पिकर्स देखील मिळतात. सिक्योरिटीसाठी यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरचा समावेश करण्यात आला आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.