Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

थांबायचं नाय गड्या! १०० कोटी कमाईनंतरही ‘मुंज्या’ची जबराट कामगिरी; ‘चंदू चॅम्पियन’ची मोठी घसरण

15

गेल्यावर्षी बॉलिवूड सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई केली होती. यंदा मात्र कमाईची गती काहीशी मंद झाल्याचे चित्र होते. ज्या चित्रपटांनी चांगली कमाई केली ते १०० कोटीचा टप्पा पार करू शकले नव्हते, मात्र ‘मुंज्या’ने हे करुन दाखवलं आणि १०० कोटींटा टप्पा ओलांडला. त्यानंतरही ‘मुंज्या’ची कमाई सुरूच आहे. ७ जून रोजी आदित्य सरपोतदार दिग्दर्शित ‘मुंज्या’ प्रदर्शित झाला, ज्याचे बजेट २५ ते ३० कोटी होते. तर त्यानंतर १४ जून रोजी कार्तिक आर्यनचा १२० कोटी रुपयांत बनलेला ‘चंदू चॅम्पियन’ प्रदर्शित झाला. चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करण्यात आले, ‘मुंज्या’ला मागे टाकण्यात ‘चंदू चॅम्पियन’ला यश आले नाही. सध्याच्या घडीला दोन्ही सिनेमांची कमाई घटत असली तरी, ‘मुंज्या’ची १८व्या दिवशी झालेली कमाई, ‘चंदू चॅम्पियन’च्या ११व्या दिवसाच्या कमाईपेक्षा खूप जास्त आहे.

​’मुंज्या’ची कमाई​

Maddock Films च्या सोशल मीडिया पोस्टनुसार, प्रदर्शित झाल्यानंतर ‘मुंज्या’ने पहिल्या आठवड्यात ३६.५० कोटींचा मोठा गल्ला कमावला होता. पहिल्यात आठवड्यात सिनेमाने बजेटपेक्षा जास्त कमाई केली. त्यानंतर दुसऱ्या आठवड्यात या सिनेमाने ३४.५० कोटी कमावले. त्यानंतर १५व्या दिवशी (२१ जून) ३.३१ कोटी, १६व्या दिवशी (२२ जून) ५.८० कोटी आणि १७व्या दिवशी (२३ जून) ७.२० कोटी अशी कमाई झाली. यानंतर प्रदर्शित झाल्यानंतरच्या तिसऱ्या सोमवारी अर्थात अठराव्या दिवशी (२४ जून) ‘मुंज्या’ने २.५० कोटी कमावले.

​एकूण कलेक्शन​

​एकूण कलेक्शन​

१८ दिवसांच्या या कमाईनंतर ‘मुंज्या’चे नेट बॉक्स ऑफिस कलेक्शन ८९.८१ कोटी झाले आहे. तर ग्रॉस बॉक्स ऑफिस कलेक्शन १०५.९५ कोटी इतके झाले आहे. या सिनेमाने परदेशातही साधारण ४ ते ५ कोटींचा गल्ला कमावला आहे. दरम्यान येत्या २७ जून रोजी प्रभास, दीपिका पादुकोण, अमिताभ बच्चन आणि कमल हासन यांची मुख्य भूमिका असणारा ‘कल्की २८९८ एडी’ हा सिनेमा प्रदर्शित होतो आहे. त्यामुळे ‘मुंज्या’सह ‘चंदू चॅम्पियन’च्या कलेक्शनमध्ये मोठी घसरण होण्याची शक्यता आहे. शिवाय या दोन्ही सिनेमांचे शोदेखील कमी होऊ शकतात.

तिसरा हिट सिनेमा

तिसरा हिट सिनेमा

दिनेश विजान आणि अमर कौशिक यांनी ‘मुंज्या’ची निर्मिती केली आहे. त्यांनी ‘स्त्री’, ‘भेडिया’सारखे चित्रपट दिले. सध्या त्यांच्या स्त्री २चाही धडकी भरवणारा टीजर समोर आला. ‘मुंज्या’चे दिग्दर्शन आदित्य सरपोतदार या मराठी कलाकाराचे आहे. ‘मुंज्या’मध्ये कोणताही बडा स्टार नाही, तर तगडे कलाकार आणि चांगला कंटेटच्या जोरावर सिनेमाने १०० कोटींचा टप्पा गाठला. चित्रपटात अभय वर्मा, शर्वरी वाघ महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. तर मोना सिंह, तरन सिंग, सत्यराज हे कलाकारही आहेत. याशिवाय सुहास जोशी, भाग्यश्री लिमये, अजय पुरकर, खुशी हजारे, आयुष उलगड्डे, श्रुती मराठे, अभिजीत चव्हाण हे मराठी कलाकार लक्ष वेधून घेणारे ठरतात. २०२४ या वर्षात ‘आर्टिकल ३७०’ आणि ‘शैतान’नंतर ‘मुंज्या’ हा तिसरा हिट सिनेमा ठरला.

​’चंदू चॅम्पियन’ची कमाई​

​चंदू चॅम्पियनची कमाई​

Sacnilk च्या रिपोर्टनुसार, पहिल्या आठवड्यात ‘चंदू चॅम्पियन’ने ३५.२५ कोटींची कमाई करत दणक्यात एन्ट्री केली होती. मात्र दुसऱ्या आठवड्यात हा आकडा घसरू लागला. आठव्या दिवशी सिनेमाचे भारतातील कलेक्शन २.६५ कोटी होते. नवव्या दिवशी (२२ जून) ४.८५ कोटी, दहाव्या दिवशी (२३ जून) ६.५ कोटी आणि ११व्या दिवशी (२४ जून) १.७५ कोटी कमावले. सिनेमाचे नेट बॉक्स ऑफिस कलेक्शन ५१ कोटींचे झाले आहे. तर ग्रॉस बॉक्स ऑफिस कलेक्शन ६०.६५ कोटी आहे. त्यामुळे आतापर्यंत बजेटच्या निम्मीच कमाई झाल्याचे म्हणावे लागेल.

​भीती ‘कल्की २८९८ एडी’ची​

​भीती कल्की २८९८ एडीची​

२७ जून रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. आधी नमूद केल्याप्रमाणे सिनेमात तगडी स्टारकास्ट तर आहेच, शिवाय सध्या जोरदार प्रमोशनही सुरू आहे. देशभरात विविध भाषांमध्ये प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमाचे आगाऊ बुकिंग सुरू झाले असून, Sacnilk च्या रिपोर्टनुसार, २डी, ३डी, आयमॅक्स ३डीसाठी जवळपास ७ लाख तिकिटांची विक्री झाली आहे. या Advance Booking मधून ‘कल्की २८९८ एडी’ने आतापर्यंत २०.६८ कोटींचा गल्ला जमवला आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.