Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Unemployment In India : 18 लाख कारखाने बंद पडले, 54 लाख लोकांच्या नोकऱ्या गेल्या, धक्कादायक अहवाल आला समोर

12

नवी दिल्ली : भारताच्या प्रमुख समस्यांमध्ये ‘बेरोजगारी’ या समस्येचा समावेश आहे. दरवर्षी लाखो विद्यार्थी कॉलेज मधून पदवी घेऊन बाहेर पडतात. परंतु त्यांना नोकऱ्या मिळत नाही. 2019 मध्ये कोरोना महामारी आली आणि लाखो लोकांचे रोजगार गेले. कोरोना महामारीमध्ये आयटी क्षेत्राला चांगले दिवस आले. परंतु आता त्याला देखील उतरती कळा लागली आहे. अशातच आता राष्ट्रीय सांख्यिकी मंत्रालयाने (NSO)नुकतेच असंघटित क्षेत्रातील उपक्रमांचे वार्षिक सर्वेक्षण प्रसिद्ध केले असून त्यातून लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्याची माहिती समोर आली आहे.

54 लाख लोकांच्या गेल्या नोकऱ्या

अहवालानुसार जुलै, 2015 ते जून, 2016 आणि ऑक्टोबर, 2022 ते सप्टेंबर, 2023 या कालावधीत भारतात 18 लाख कारखाने बंद पडल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे या कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या 54 लाख लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत .बिझनेस स्टँडर्डच्या अहवालात या सर्वेक्षणाचा आढावा घेण्यात आला आहे. त्यानुसार जुलै 2015 ते जून 2016 दरम्यान उत्पादन क्षेत्रात सुमारे 197 लाख असंघटित कारखाने सुरू होते. परंतु ऑक्टोबर 2022 ते सप्टेंबर 2023 दरम्यान ही संख्या 178.2 लाख इतकी कमी झाली आहे.
Rahul Gandhi Video: जय हिंद, जय संविधान… राहुल गांधी शपथ घेण्यासाठी पोहोचले तेव्हा सभागृहाचा नजाराच बदलला!

कारखाने कसले होते?

यामध्ये लहान असंघटित उद्योगांचा समावेश होता. भारतातील असंघटित क्षेत्रात एकूण 10.96 कोटी लोक काम करत आहेत. पण हा आकडा कोरोना महामारीच्या तुलनेत कमी असल्याचं सांगण्यात आले आहे.

छोटे आणि मध्यम कारखाने रोजगाराचे साधन

सांख्यिकी स्थायी समितीचे अध्यक्ष प्रणव सेन यांनी आपले मत व्यक्त केले आहे ते म्हणाले की,अलीकडच्या काही धोरणात्मक निर्णयांमुळे आणि लॉकडाऊनमुळे असंघटित क्षेत्राला मोठा फटका बसला आहे यात शंका नाही. बहुतेक लोकांचे स्वतःचे व्यवसाय आहेत. त्यामुळे उत्पादन क्षेत्रातील सुमारे 54 लाख नोकऱ्या गेल्या आहेत. छोटे आणि मध्यम कारखाने हे रोजगाराचे सर्वात मोठे साधन असल्याचे कामगार अर्थतज्ज्ञ सांगत असतात मात्र हे असंच सुरू राहिले तर अर्थव्यवस्था धोक्यात येईल”.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.