Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
मारहाण करुन जबरदस्तीने लुटणार्या सहा जणांच्या टोळक्यास गंगापुर पोलिसांनी केले जेरबंद,लुटलेला मुद्देमाल केला हस्तगत…
नाशिक(शहर प्रतिनिधी) -,गंगापुर पोलिस स्टेशन हद्दीत शिवाजीनगर फाशीचा डोंगर येथे दोन इसमांना मारहाण करून त्यांचे अंगावरील सोन्याची चैन, अंगठी, मोबाईल, घडयाळ, रोख रक्कम बळजबरीने काढून घेणा-या इसमानां अटक करुन त्यांचेकडुन ४,१०,०००/- रुपयाचा मुददेमाल केला हस्तगत
याबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(१५)जुन रोजी रात्री ०२:४५ वा चे सुमारास गंगापुर पोलिस ठाणे हद्दीत शिवाजीनगर फाशीचा डोंगर, नाशिक येथे यश चंद्रकांत कोठावदे वय २७ वर्षे, रा. फ्लॅट नं. ०१, सरस्वती अपार्टमेंट, साधू वासवाणी रोड, कुलकर्णी कॉलनी, शरणपुररोड, नाशिक व त्यांचा मित्र वैभव असे त्यांची टियागो गाडी
रस्त्याचे कडेला थांबवुन लघूशंका करत असतांना तीन मोटरसायकलवर बसून आलेल्या सहा इसमांनी यश चंद्रकांत कोठावदे यांना मारहाण करून त्यांचे टियागो गाडीवर दगड टाकून मोबाईल फोन, अंगठी, गळयातील सोन्याची चैन तसेच रोख रक्कम काढून व दोघांना मारहाण करून पळून गेले होते.
सदर बाबत गंगापुर पोलिस ठाणे येथे गुरनं. १४९/२०२४ भादंवि कलम ३९२, ३२३, ५०४, ५०६, ४२७,३४ प्रमाणे दि. १७/०६/ २०२४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयातील फिर्यादी यश कोठावदे यांचे पुरवणी जबाबावरून गुन्हयात भादंवि कलम ३९५ नुसार वाढ करण्यात आली आहे. सदर गुन्हयात फिर्यादी यांचा चोरीस गेलेला मोबाईल फोन मधून आरोपीने फोन पे अॅपद्वारे आर्थिक व्यवहार करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु तो सफल झाला नाही. सदर व्यवहाराबाबत तांत्रिक माहिती घेवून
आरोपीचा मोबाईल नंबर मिळवून तो यश वसंत रणधीर रा. कामटवाडे शिवार, नाशिक याचे नावावर असल्याचे निष्पन्न झाले.यावरुन सर्व आरोपींचा अंबड पोलिस स्टेशन हद्दीत शोध घेतला असता त्यास त्यांना पोलिसांवी चाहूल लागल्याने तो त्याचे साथीदारांसह सदर ठिकाणाहून पळून उल्हास नगर व तेथून मालेगांव येथे गेल्याची गुप्तबातमी पोउनि पाटील यांना मिळाली. मिळालेल्या बातमी प्रमाणे वरिष्ठांचे आदेशान्वये गुन्हे शोध पथकाचे पोउनि पाटील,पोशि गोरख साळुंके, सोनू खाडे, सुजित जाधव, भागवत थविल अशांनी कलेक्टर पट्टा मालेगांव येथे आरोपींचा शोध घेतला असता भूषण त्रंबक गोलाईत, वय १९ वर्षे, कृष्णा संतोष दळवी वय २० वर्षे दोघे रा.सिडको नाशिक असे मिळून आले. त्यानंतर मिळालेल्या गोपनीय माहिती प्रमाणे उर्वरीत चार आरोपी पंचवटी व तपोवन परिसरात असले बाबत माहिती मिळाली सदर परिसरात पोउनि पाटील,पोशि सोनू खाडे, सुजित जाधव, भागवत थविल, वाकचौरे अशांनी सापळा रचून चार आरोपींना ताब्यात घेतले. सदर गुन्हयात निष्पन्न झालेल्या आरोपीतांचे नावे पुढीलप्रमाणे
१) भूषण त्रंबक गोलाईत, वय १९ वर्षे, रा. खांडेकरनगर,माउली लॉन्स, पवननगर सिडको, नाशिक
२) कृष्णा संतोष दळवी वय २० वर्षे रा. कोकणभवन, कामटवाडे, सिडको, नाशिक
३) निलेश सुनिल कुमावत, वय २१ वर्ष, रा. पाण्याच्या टाकीजवळ वॉचमन रुम मध्ये पवननगर सिडको नाशिक
(४) आदिल आसिफ खाटीक, वय २० वर्ष, रा. तोरणानगर, उदरकॉलनी, गणपती मंदीराजवळ, पवननगर सिडको
५) यश उर्फ सोनु वंसत रणधीर, वय १९ वर्ष, रा. कामटवाडा नाशिक
६) चंदु गोपाळ आवळे, वय- १९ वर्ष, रा. वनश्री कॉलनी, डी. जी. पी. नगर २ नाशिक
वर नमुद ०६ आरोपीतांकडुन सदर गुन्हयात बळजबरीने चोरून नेलेला खालीलप्रमाणे मुद्देमाल हस्तगत करण्यात आला
१) १५ ग्रॅम वजनाची सोन्याची लगड किंमत ८०,०००/- रु
२) ४ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी किंमत ४००००/-रु
३) काळया रंगाची होंडा स्प्लेंडर काळया रंगाची मोटारसायकल क्रमांक एम एच १५ जे क्यु ११४७ किंमत ९००००/-रु
४) हिरव्या रंगाचा सॅमसंग गॅलक्सी कंपनीचा मोबाईल हॅन्डसेट किंमत १००००/-रु
५) काळया रंगाची बजाज प्लसर मोटारसायकल क्रमांक एम एच १५ एच झेड ८७७२ किंमत ९००००/-रु
६) पांढ-या निळया रंगाची यमाहा कंपनीची आर १५ एम मोटारसायकल क्रमांक एम एच १५ जे पी २७१३ किंमत ९००००/-रु
७) आरमानी एक्सचेंज कंपनीचे घडयाळ किंमत १००००/-रु
असा एकुन ४,१०,०००/- रु किंमतीचा एकुण मुदेदमाल आरोपींकडुन हस्तगत करण्यात आला असुन आरोपींना सदर गुन्हयात अटक करण्यात आली असुन अटक आरोपींचे दाखल गुन्हयांचे रेकॉर्ड तपासले असता आरोपी क्रमांक १) भूषण त्रंबक गोलाईत, वय १९ वर्षे, आरोपी क्र ३) निलेश सुनिल कुमावत, वय २१ वर्ष यांचेवर अंबड पोलिस ठाणे येथे गुरनं १२१ / २०२२ भादवी
कलम ४३९, ३०७, ३२६, ५०४, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
सदरची उल्लेखनिय कामगिरी पोलिस आयुक्त.संदिप कर्णिक, पोलिस उपायुक्त, परी १ किरणकुमार चव्हाण,सहा पोलिस उपायुक्त, सरकारवाडा उपविभाग सिध्देश्वर धुमाळ यांचे मार्गदर्शनाप्रमाणे गंगापुर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक तृप्ती सोनवणे, सपोनि सोमनाथ गॅगजे, पोउनि मोतीलाल पाटील, पोहवा रविंद्र मोहीते, नापोशि विनायक आव्हाड, पोशि मच्छिंद्र वाकचौरे, रमेश गोसावी, सोनु खाडे,सुजित जाधव,गोरख साळुंके विजय नवले, भागवत थविल, पोहवा गणेश रेहरे,मधुकर सहाणे यांनी केली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास सपोनि सोमनाथ गेंगजे हे करीत आहेत.