Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
ITMS: वाहनचालकांनो सावधान! नियमांचं उल्लंघन कराल तर होईल कारवाई, १ जुलैपासून होणार नव्या नियमाची अंमलबजावणी
दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांना रोखण्यासाठी कर्नाटक पोलीस कठोर पावलं उचलाताना पाहायला मिळत आहे. पोलिसांनी राज्यभरात ८०० अल्कोमीटरसह १५५ लेझर स्पीड गन वितरित केल्या आहेत. यावर येथील रस्ता सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले की, १ जुलैपासून संपूर्ण बेंगळुरू-म्हैसूर एक्स्प्रेस वे इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट या आधुनिक प्रणालीने सुसज्ज होणार आहे. ही प्रणाली डिसेंबर २०२२ मध्ये बंगळुरूमध्ये लाँच करण्यात आली. ITMS तंत्रज्ञानांतर्गत ५० प्रमुख जंक्शनवर २५० स्वयंचलित नंबर प्लेट ओळखणारे कॅमेरे आणि ८० लाल दिवा शोधणारे कॅमेरे बसवण्यात आले आहेत. म्हैसूरमध्ये वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना १ जुलैपासून चलान मिळण्यास सुरुवात होणार आहे.
आलोक कुमार यांनी एका वृत्तपत्राला माहिती देताना असेही सांगितले की, म्हैसूरमध्ये वाहतूक व्यवस्थापन केंद्र सुरू करण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना रिअल टाइमवर एसएमएस अलर्ट मिळणार आहे आणि कॅमेऱ्यांच्या मदतीने अनेक भागांवर विभागाचे बारकाईने लक्ष असणार आहे.
इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट प्रणाली नेमकी कशी काम करते?
इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम (ITMS) ही ट्रॅफिक समस्येचा सामना करणारी आधुनिक प्रणाली आहे. यासाठी कनेक्टेड तंत्रज्ञान वापरले जाते. त्यामुळे रस्त्यांवर एकप्रकारची सुरक्षितता निर्माण होण्यास मदत होते जेणेकरून गर्दी कमी होण्यास मदत होते. यासाठी ऑटोमॅटिक आयडेंटिफिकेशन अँड डेटा कलेक्शन (AIDC) टॅग, रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन (RFID) टॅग, एअर क्वालिटी सेन्सर आणि तापमान सेन्सर यांसारखे अनेक इंटिग्रेटेड सेन्सर वापरले जातात. रिअल-टाइमची माहिती मिळविण्यासाठी अॅडव्हान्स व्हिडिओ डिटेक्शन प्रणाली वापरली जाते. यासाठी एचडी फुटेज आणि फोटोंचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे वाहतुकीशी संबंधित समस्या सोडण्यासाठी रस्ते विभागाला या सुसज्ज प्रणालीची मोठी मदत होते.
महाराष्ट्रातही अंमलात येणार स्मार्ट प्रणाली
महामार्गांवरील वाढत्या अपघातांमुळे रस्ते सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्यानंतर राज्यातही इंटेलिजेंट ट्रैफिक मैनेजमेंट सिस्टम प्रणालीचा अवलंब करणार असल्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घोषित केले होते. महामार्गांवर ही सिस्टम तयार करण्याचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. लवकरच ही प्रणाली अंमलात येणार असल्याने रस्ता सुरक्षेचा प्रश्न सुटणार आहे.