Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Success Story: तंत्रज्ञान क्षेत्रात भारताचा डंका; तरुणाने बनवले असे ‘सॉफ्टवेअर’ ज्याची अमेरिकेने घेतली दखल
देशाच्या अशाच एका प्रतिभावंत तरुणाने तांत्रिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. त्याने तंत्रज्ञान क्षेत्रात जगासाठी दिलेल्या योगदानाची अमेरिकेच्या ‘द मार्किस हूज हू पब्लिकेशन बोर्ड’ ने दखल घेतली आहे. देवप्रियाने दिलेल्या योगदानासाठी बोर्डकडून त्याला गौरवण्यात आले आहे. सोबतच २०२४-२५ या वर्षात देशपातळीवरील ५० सर्वोत्तम तांत्रिक तज्ञ्ज म्हणून निवड झालेल्या तरुणांनाही सन्मानित करण्यात आले आहे.
देवने बनवले ‘पर्पल’ सॉफ्टवेअर
देवप्रियने पर्पल ए1 नावाचे सॉफ्टवेअरचा शोध लावला होता, ज्याचा वापर करुन जनरेटिव्ह च्या आधारे अँटीव्हायरस तयार केले जाते. हे तंत्र अतिशय उपयुक्त मानले जाते. ज्याकडे आजपर्यंत कोणीही लक्ष दिले नव्हते. तंत्रज्ञान क्षेत्रासाठी हे उपयुक्त ठरणार असल्याचे संस्थेने मानले आहे. या आधारावर संस्थकडून देवची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुलाखत घेण्यात आली होती. त्यानंतर निवड झाल्यावर देवला कुरिअरद्वारे उत्कृष्टतेचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
बिहारमधील सीतामढीच्या देवप्रियचा खडतर शैक्षणिक प्रवास
देव प्रिय हा मूळचा बिहारमधील सीतामढी जिल्ह्यातील रुन्नी सैदपूर भागातील रामपूर गावचा रहिवासी आहे. अरविंद कुमार आणि शिप्रा यांचा तो मुलगा. त्याचे प्रारंभिक शिक्षण आणि संगोपन मुझफ्फरपूर येथे निवृत्त शिक्षक आजोबा, रामसेवक सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. त्याने नॉर्थ पॉइंट स्कूलमध्ये १०वी शिक्षण घेतले आणि दरभंगा येथे प्लस टू चे शिक्षणात देखील चांगले यश मिळवले.
तांत्रिक क्षेत्रात अनेक पदवी मिळवत देवने ध्येय गाठले
उच्च शिक्षणासाठी, देव बंगळुरू गाठले जिथे त्याने पेशिट इन्स्टिट्यूटमधून बीटेक पदवी मिळवली. नंतर त्याने व्यापक ध्येय ठरवले आणि तो अमेरिकेत गेला, जिथे त्याने जॉर्जिया टेक युनिव्हर्सिटीमधून एमटेक पदवी मिळवली आणि आपल्या व्यावसायिक प्रवासाला सुरुवात केली. गेल्या काही वर्षांमध्ये त्याने मेडालिया, ट्विटर आणि फेसबुक सारख्या प्रसिद्ध कंपन्यांमध्ये काम केले आहे. सध्या तो सेंटिनेल येथे तांत्रिक तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे.
एक नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान जे अँटीव्हायरस सोल्यूशन्स तयार करते, अशा क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देऊन देवने यश आजमावले आहे. यापूर्वी कोणाकडेही अशी कामगिरी करण्याची क्षमता नव्हती. त्याच्या तांत्रिक शोधाची उपयुक्तता समजून, मार्क्विस हूज हू बोर्डाने त्याचा सन्मान केला आहे. हा सन्मान मिळाल्यावर देव प्रियाने कृतज्ञता व्यक्त केली. हा माझ्या परिवारासोबतच देशाचाही सन्मान असल्याचे म्हणत देवने आनंद व्यक्त केला आहे.