Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Sunita Williams: भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनिता विल्यम्स अंतराळात अडकल्या? पृथ्वीवर परतण्यासाठी फक्त २७ दिवस शिल्लक

8

वॉशिंग्टन : अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’च्या व बोईंग या खाजगी संस्थेच्या संयुक्त अंतराळ मोहिमेअंतर्गत अंतराळात गेलेल्या भारतीय वंशाच्या सुनिता विल्यम्स आणि बॅरी विलमोर हे अंतराळ यानातील काही तांत्रिक गडबडीमूळे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर(ISS) अडकून आहेत. त्यांच्या मोहिमेनंतर परत जमिनीवर आणणाऱ्या यानात केवळ २७ दिवस पुरेल इतकेच इंधन शिल्लक राहिल्याने याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

अमेरिकन अंतराळ संस्था नासाच्या व बोईंग स्टारलायनर यांच्या पहिल्या संयुक्त खाजगी संस्थेच्या अंतराळ मोहिमेअंतर्गत सुनिता विल्यम्स आणि बॅरी विलमोर या दोन अनुभवी अंतराळवीरांची निवड करण्यात आली होती. ५ जून रोजी हे दोघे अंतराळवीर बोईंग स्टारलायनर या अंतराळयानात स्वार झाले. अमेरिकेच्या केप केनेवराल येथील जॉन एफ केनेडी अंतराळस्थानकाहून या यानाने उड्डाण केले. पृथ्वीची कक्षा पार करत ते यशस्वीपणे अंतराळात दाखल झाले. मोहिमेच्या सुरुवातीला देखील या अंतराळयानात अनेक वेळा तांत्रिक समस्या निर्माण झाल्याने त्याचे प्रक्षेपण हे पुढे ढकलण्यात आले होते.

अंतराळयानात हेलियमची गळती

७ जून रोजी दोघेही अंतराळवीर सुरक्षितपणे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात दाखल झाले. मोहिम झाल्यानंतर त्यांचे त्याच यानाने परत पृथ्वीवर परतणे नियोजित होते, परंतु बोईंगच्या अंतराळयानात आढळलेल्या तांत्रिक दोषांमूळे त्यांची परत येण्याची तारीख आतापर्यंत चार वेळा पुढे ढकलण्यात आली आहे. अंतराळयानातील हेलियमच्या गळतीमूळे त्यांच्या पृथ्वीवर परतण्याची मोहीम पुढे ढकलली जात असल्याचे नासा आणि बोईंगकडून सांगण्यात आले आहे. पूर्वनियोजित मोहिमेनुसार त्यांचे १३ जून रोजी पृथ्वीवर परतणे अपेक्षित होते. परंतु दोन आठवडे झाले तरी ते अध्याप अंतराळस्थानकातच आहेत. मोहिम पुढे ढकलण्यासाठी यानात पाच ठिकाणी आढळलेली हेलियमची गळती कारणीभूत आहे. हेलियम हे यानातील रिएक्शन कंट्रोल सिस्टीम थ्रस्टर्सना ज्वलनासाठी मदत करते.
Julian Assange : ऑस्ट्रेलियन पत्रकार ज्युलियन असांजची तुरुंगातून सुटका, अमेरिकेसोबत केला ‘हा’ करार

अंतराळवीर अडकले नाहीत – नासा

बोईंग आणि नासाचे इंजिनियर अंतराळयानातील वायूगळती रोखून अंतराळविरांना सुरक्षितपणे पृथ्वीवर उतरविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. नासाने सांगितल्याप्रमाणे हे यान अंतराळ स्थानकाशी जोडल्यानंतर व्यवस्थित काम करत होते. पुढे त्यांनी सांगितले की, सुनिता आणि विलमोर हे गरज पडल्यास अंतराळ यानात येवून स्वतःला अंतराळ स्थानकाशी वेगळे करुन पृथ्वीवर येण्यास सक्षम आहेत.त्यामूळे ते ‘अडकले’ आहेत असे म्हणणे संयुक्तिक होणार नाही. त्यांना फक्त यानातील तांत्रिक दोष दुरुस्त होइपर्यंत अंतराळ स्थानकावर रहावे लागत आहे, असे सांगत यानातील दोष शोधण्यासाठी व त्याच्या दुरुस्तीसाठी मोहिमेतील तांत्रिक विशेषज्ञ यानाच्या माहितीवर काम करत असल्याचे नासाने सांगितले.

कोण आहेत सुनिता विल्यम्स ?

सुनिता विल्यम्स या भारतीय वंशाच्या महिला अंतराळवीर आहेत. १९८७ मध्ये त्या अमेरिकन नौदलामध्ये दाखल झाल्या. पुढे त्यांनी नासाच्या अनेक अंतराळ मोहिमांमध्ये सहभाग घेतला. अंतराळात सर्वाधिक स्पेसवॉक करणाऱ्या त्या पहिल्या महिला अंतराळवीर आहेत. त्यांनी आतापर्यंत ७ स्पेसवॉक केले आहेत. अंतराळात ५० तास आणि ४० मिनिटे इतका मोठा स्पेसवॉक करण्याचा विक्रमही त्यांच्या नावे आहे. ५८ वर्षीय विल्यम्स या ३२२ दिवस अंतराळात राहिलेल्या पहिल्या महिला आहेत. २००६ आणि २०१२ नंतरची ही त्यांची तिसरी अवकाश मोहीम आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.