Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Moto S50 Neo: 1 नव्हे 4 वर्षांच्या वॉरंटीसह आला स्वस्त मोबाइल; 12GB रॅमसह मिळतो 50MP कॅमेरा

8

Moto S50 Neo मंगळवारी चीनमध्ये लाँच करण्यात आला आहे. स्मार्टफोन Moto Razr 50 सीरीजसह सादर करण्यात आला होता. कंपनीनं आधीच सांगितले होते की नवीन मोटोरोला S सीरीज फोन चार वर्षांच्या वॉरंटीसह येईल. स्मार्टफोन कर्व्ड pOLED स्क्रीन आणि 50-मेगापिक्सल Sony IMX882 मेन सेन्सर असलेल्या ड्युअल रियर कॅमेरा सेटअपसह येतो. याची जाडी फक्त 7.59 mm आहे आणि वजन 171 ग्राम आहे. फोन Qualcomm Snapdragon 6s Gen 3 चिपसेटवर चालतो आणि यात 5,000mAh ची बॅटरी मिळते. Moto S50 Neo ची आणखी एक खासियत म्हणजे Dolby Atmos-सपोर्टेड ड्युअल स्टीरियो स्पिकर्स आहेत.

Moto S50 Neo ची किंमत

Moto S50 Neo ची किंमत चीनमध्ये 1,399 युआन (जवळपास 16,100 रुपये) पासून सुरु होते. ज्यात 8GB रॅमसह 256GB स्टोरेज ऑप्शन मिळेल. सोबत 12GB + 256GB आणि 12GB + 512GB स्टोरेज व्हेरिएंट देखील आहेत, ज्यांची किंमत अनुक्रमे 1,599 युआन (जवळपास 18,400 रुपये) आणि 1,899 युआन (जवळपास 21,800 रुपये) आहे. फोन लॅटिन्ग, जिमो आणि क्विंगटियन कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आला आहे अर्थात हे ब्लू, ब्लॅक आणि ग्रीन कलर आहेत. कंपनीनं लाँच इव्हेंटमध्ये सांगितलं आहे की या स्मार्टफोनची विक्री 28 जून पासून लेनोवो चायना ई-स्टोरवर सुरु होईल.

Moto S50 Neo चे स्पेसिफिकेशन

Moto S50 Neo मध्ये 6.7-इंचाचा फुल-एचडी+ (1,080 x 2,400 पिक्सल) कर्व्ड pOLED डिस्प्ले मिळतो, जो 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट आणि 1,600 nits पीक ब्राइटनेस लेव्हलला सपोर्ट करते. कंपनीनुसार, हा ड्युअल SGS आय प्रोटेक्शन सर्टिफिकेशनसह आला आहे. फोन Qualcomm Snapdragon 6s Gen 3 SoC वर चालतो, जो 12GB पर्यंत LPDDR4 रॅम आणि 512GB पर्यंत स्टोरेजसह जोडला आहे.

Moto S50 Neo मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सिस्टम आहे, ज्यात मेन कॅमेरा 50-मेगापिक्सलचा Sony IMX882 सेन्सर आहे आणि दुसरा 8-मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आहे. यात 32 मेगापिक्सलचा फ्रंट-फेसिंग शूटर मिळतो.

Moto S50 Neo मध्ये 30W चार्जिंगला सपोर्टसह 5,000mAh ची बॅटरी आहे. फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनरसह येतो. कनेक्टिव्हिटी ऑप्शनमध्ये 5G, 4G, वाय-फाय, ब्लूटूथ, NFC आणि USB Type-C पोर्ट मिळतात. विशेष म्हणजे यात Dolby Atmos-सपोर्टेड ड्युअल स्टीरियो स्पिकर आहे. हँडसेटची आकार 161.91 x 73.06 x 7.59 mm आहे. याच्या ब्लॅक कलर व्हेरिएंटचे वजन 171 ग्राम आणि अन्य दोनचे वजन 173 ग्राम आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.