Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

hacker’s email: पाक, यूपीतील हॅकर्सनी केला पोलिस अधिकाऱ्याचा ईमेल हॅक; सरकारी खात्यांमध्ये खळबळ

32

हायलाइट्स:

  • हॅकर्सच्या एका ईमेलमुले सरकार खात्यांमध्ये उडाली खळबळ.
  • Terrorist behind JK attack, gunned down in Mumbai या विषयाचा फिशींग मेल डिलिव्हर होत आहे.
  • फिशींग मेलमध्ये एक पीडीएफ फाईल ॲटच करण्यात आली आहे

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई

शासकीय कार्यालये आणि खात्यांमध्ये सध्या धडकणाऱ्या एका इमेल (Email) मुळे खळबळ उडाली आहे. पाकिस्तान (Pakistan) आणि उत्तर प्रदेशमधील हॅकेर्सनी (Hackers) सायबर पोलिस ठाण्यातील एका अधिकाऱ्याचा इमेल हॅक करून सर्व शासकिय ईमेल आयडीवर एक फिशींग मेल डिलीव्हर केला जात आहे. यामध्ये रिपोर्ट इंटेलिजन्स डॉट पीडीएफ नावाची फाईल दिसत असून ती उघडू असा ॲलर्ट महाराष्ट्र सायबर पोलिसांनी केले आहे. (sensation in government departments due to email of hackers from pakistan and up and cyber police alert)

मुंबईतील पूर्व प्रादेशिक विभाग पोलिस ठाण्यातील अधिकारी राजेश शिवाजीराव नागवडे यांच्या नावाने असलेल्या आयडीवरून Terrorist behind JK attack, gunned down in Mumbai या विषयाचा फिशींग मेल डिलिव्हर होत आहे. सर्व शासकीय कार्यालयांच्या इमेल आयडीवर हा मेल येत असल्याने खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र सायबर पोलिसांच्या पथकाने याबाबत तांत्रिक तपास केला असता पाकिस्तान आणि उत्तरप्रदेश येथून हे मेल असल्याचे दिसून येत आहे.

क्लिक करा आणि वाचा- भाजप, केंद्र सरकारच्या एजन्सींच्या विरोधात पूर्ण ताकदीने लढणार; राष्ट्रवादी आक्रमक

फिशींग मेलमध्ये एक पीडीएफ फाईल ॲटच करण्यात आली आहे. हा मेल, यामधील लिंक तसेच पीडीएफ फाईल डाऊनलोड केल्यास आपली सर्व माहीती, आयडी संदर्भातील सर्व तपशील हॅकर्सकडे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासकीय इमेल हॅक होण्याचाही धोका आहे. त्यामुळे शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांनी काळजी घ्यावी, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.

क्लिक करा आणि वाचा- मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतील नव्या शहराचं भाजपनं ठरवलं ‘हे’ नाव अन् दर्जाही
क्लिक करा आणि वाचा- करोना: राज्यात आज नव्या रुग्णांची संख्या पुन्हा २ हजारांवर; मृत्यूही वाढले

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.