Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Protesters storm Kenya’s parliament : केनियात हिंसाचार उफाळला,नागरिकांनी संसदेला लावली आग, नेमकं काय आहे प्रकरण ?
भारतीय नागरिकांसाठी ॲडव्हायजरी केली जारी
दरम्यान, या हिंसचारानंतर केनियात राहणाऱ्या भारतीयांसाठी केनिया सरकारने ॲडव्हायजरी जारी केली आहे. तसेच नागरिकांना अत्यंत सावधगिरी बाळगण्याचा करण्याचा सल्ला दिला आहे.
विधेयकाला विरोध का ?
केनिया सरकारने संसदेत मंजूर केलेल्या विधेयकात इंटरनेट डेटा, इंधन, बँक हस्तांतरण आणि डायपरसह अनेक दैनंदिन वापराच्या वस्तू आणि सेवांवर कर वाढवण्याचा उल्लेख करण्यात आला आहे. त्याचबरोबर केनियामध्ये वाढत्या महागाईच्या काळात या सवलती देण्याऐवजी वस्तूंवरील कर आणखी वाढवण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत.
पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या
हजारो लोकांनी केनियाच्या संसदेवर हल्ला केल्यानंतर पोलिसांनी नागरिकांना रोखण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडत नागरिकांवर थेट गोळ्या झाडल्या आहेत.
भारतीय दूतवासाने घेतली दखल
केनियातील भारतीय दूतावासाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केली आहे. ते म्हणाले की, “निदर्शने आणि हिंसाचाराने प्रभावित असलेल्या भागात भारतीय नागरिकांनी टाळावे. तसेच स्थानिक बातम्या आणि मिशनची वेबसाइट आणि सोशल मीडिया हँडल फॉलो करा,”
आंदोलकांची केनियाच्या राष्ट्राध्यक्षांवर टीका
आंदोलकांनी केनियाचे राष्ट्राध्यक्ष रुटो यांच्यावर टीका केली आहे. रुटो यांच्या सरकारने कर वाढीचा प्रस्ताव मांडणारे वादग्रस्त विधेयक मंजूर केल्यामुळे लोकांचा हिंसाचार उफाळला आहे. रुटो हे 2022 मध्ये केनियाचे राष्ट्राध्यक्ष झाले आहे. अशातच कर वाढीबद्दलचे विधेयक संसदेत मंजूर करून त्यांनी जनतेचा विश्वासघात केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.