Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

OnePlus Nord CE4 Lite 5G: दोन दिवस टिकेल या वनप्लस फोनची बॅटरी; आज डिस्काउंटसह सुरु होईल विक्री

13

वनप्लसचा शानदार मिड रेंज स्मार्टफोन OnePlus Nord CE4 Lite 5G गेल्या आठवड्यात भारतात 24 जूनला लाँच झाला आहे. जर तुम्ही वनप्लसचा हा फोन खरेदी करू इच्छित असाल तर 27 जून म्हणजे उद्या फोन विकत घेता येईल. Nord CE4 Lite फोन 20,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत येणारा फोन आहे.

OnePlus Nord CE4 Lite 5G ची पहिली विक्री 27 जून, दुपारी 12 वाजल्यापासून सुरु होईल. हा फोन आयसीआयसीआय आणि वनकार्डवरून खरेदी केल्यास 1000 रुपयांची इंस्टंट सूट मिळेल. त्यानंतर फक्त 18,999 रुपयांमध्ये फोन तुमचा होईल. फोनचा मेगा ब्लू आणि सुपर सिल्व्हर कलर ऑप्शन 27 जूनपासून अ‍ॅमेझॉन, वनप्लस इंडिया वेबसाइट आणि विजय सेल्सवर विक्रीसाठी उपलब्ध होतील. अल्ट्रा ऑरेंज व्हेरिएंट काही दिवसांनी बाजारात येईल. चला जाणून घेऊया फोनच्या सर्व व्हेरिएंटची किंमत आणि फीचर्स:

OnePlus Nord CE4 Lite 5G ची किंमत

वनप्लस नॉर्ड सीई 4 लाइट 5जी भारतात 8GB + 128GB ऑप्शनमध्ये सादर करण्यात आला आहे ज्याची किंमत 19,999 रुपये आहे. तर 8GB रॅम व 256GB व्हेरिएंटची किंमत 22,999 रुपये आहे. फोन देशात मेगा ब्लू, सुपर सिल्व्हर आणि अल्ट्रा ऑरेंज कलरमध्ये सादर करण्यात आला आहे.
OnePlus Nord CE4 Lite 5G फोन 50MP कॅमेऱ्यासह भारतात लाँच, जाणून घ्या किंमत

OnePlus Nord CE4 Lite 5G चे स्पेसिफिकेशन

वनप्लस नॉर्ड सीई 4 लाइट 5जी मध्ये 6.67-इंचाची फुल-एचडी+ AMOLED स्क्रीन आहे, जी 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करते. हँडसेट क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 695 SoC वर चालतो. यात एड्रेनो 619 GPU, 8GB LPDDR4X रॅम आणि 256GB पर्यंत UFS 2.2 ऑनबोर्ड स्टोरेज देण्यात आली आहे. हा अँड्रॉइड 14-आधारित OxygenOS 14 सह येतो.

OnePlus Nord CE4 Lite 5G मध्ये ड्युअल रियर कॅमेरा यूनिट आहे ज्यात ऑप्टिकल इमेज स्टेबिलाइजेशन (OIS) सह 1/1.95-इंचाचा 50-मेगापिक्सल Sony LYT-600 प्रायमरी सेन्सर आणि 2-मेगापिक्सल डेप्थ सेन्सरचा समावेश आहे. फ्रंट कॅमेरा 16-मेगापिक्सल सेन्सरसह इलेक्ट्रॉनिक इमेज स्टेबिलाइजेशन (EIS) सपोर्टसह येतो.

वनप्लस नॉर्ड CE 4 लाइट 5G मध्ये 5,500mAh ची बॅटरी आहे जी 80W वायर्ड SuperVOOC आणि 5W रिवर्स चार्जिंगला सपोर्ट करते. हँडसेट धूळ आणि पाण्याच्या शिंतोडण्यापासून वाचण्यासाठी IP54 रेटिंग मिळाली आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.