Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Harsimrat Kaur: महाराष्ट्रात जे केलं, तेच आमच्यासोबत…; शिवसेनेनंतर आणखी एका मित्रपक्षाचे BJPवर गंभीर आरोप

10

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीनंतर भाजपसाठी एनडीएतील घटक पक्ष महत्त्वाचे झाले आहेत. स्वबळावर बहुमताचा आकडा गाठता न आल्यानं भाजपला आता मित्रपक्षांना सांभाळत सरकार चालवण्याची कसरत करावी लागत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात टिडीपी आणि जेडीयुला महत्त्वाचं स्थान देण्यात आलं आहे. त्यातच आता ऑपरेशन लोटसची चर्चा सुरु झाली आहे.

भाजपचा जुना मित्रपक्ष असलेल्या शिरोमणी अकाली दलानं भाजपवर अतिशय गंभीर आरोप केले आहेत. ऑपरेशन लोटसच्या माध्यमातून भाजप प्रादेशिक पक्षांना कमजोर करत असल्याचा आरोप शिरोमणी अकाली दलाचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष परमजीत सिंह सरना यांनी केला आहे. ‘मी लेखी स्वरुपात आरोप केलेले आहेत. भाजपला माझे आरोप खोटे वाटत असतील तर त्यांनी माझ्यासोबत वादविवाद करावा. ऑपरेशन लोटस सुरु असल्याचे आरोप मी सिद्ध करुन दाखवेन. प्रादेशिक पक्षांना कमकुवत करण्याचे, त्यांना संपवण्याचे प्रयत्न भाजपकडून सुरु आहेत. आम्ही भाजपचे प्रयत्न हाणून पाडू,’ असं परमजीत म्हणाले.
सदनात आक्रमक व्हा! ‘ती’ प्रकरणं बाहेर काढा! काँग्रेस नेत्यांना सूचना, शिंदे सरकारला घेरणार
शिरोमणी अकाली दलाच्या वरिष्ठ नेत्यांच्या एका गटानं पक्षप्रमुख सुखबीर सिंह बादल यांच्याविरोधात भूमिका घेतली. लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची जबाबदारी घेऊन बादल यांनी पक्षप्रमुख पदाचा राजीनामा द्यावा, असा प्रस्ताव वरिष्ठ नेत्यांनी मंजूर केला. हा बादल यांच्यासाठी मोठा झटका मानला जात आहे. परमिंदर सिंह ढिंडसा, बीबी जागीर कौर आणि अन्य नेत्यांनी पक्षात नेतृत्त्व बदलाची मागणी केली. त्यांनी बादल यांच्याविरोधात बंडाची भूमिका घेतली आहे.
दादांचे आमदार परतणार माघारी? घरवापसीसाठी पवारांच्या अटी ठरल्या; ‘त्या’ ४ नेत्यांना नो एंट्री?
अकाली दलाच्या खासदार आणि सुखबीर सिंग बादल यांच्या पत्नी हरसिमरत कौर यांनी भाजपविरोधात उघड भूमिका घेतली आहे. ‘अकाली दलात एकजूट आहे. पक्ष बादल यांच्यासोबत उभा आहे. भाजपचे काही जण अकाली दलात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्रात जे घडलं त्याची पुनरावृत्ती करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. पण हे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत,’ असं कौर म्हणाल्या.

शिरोमणी अकाली दल भाजपचा जुना मित्र राहिला आहे. शिवसेना आणि भाजप १९८९ पासून युतीत निवडणुका लढवत आहेत. तर अकाली दलानं १९९६ मध्ये वाजपेयी सरकारला पाठिंबा दिला. त्यानंतर दोन्ही पक्षांनी अनेक निवडणुका सोबत राहिल्या. दोन्ही पक्षांची युती बराच काळ राज्यात सत्तेत होती.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.