Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
ह्यूमिडिफायर म्हणजे काय?
ह्यूमिडिफायर एक असे डिवाइस आहे जे हवेतील ह्यूमिडिटीची डिवाइस वाढवते. यात पाण्याला बारीक थेंब किंवा वाफेत बदलून हवेतील ह्यूमिडिटीची वाढवली जाते. ह्यूमिडिफायरचे विविध प्रकार असतात
- कूल मिस्ट ह्यूमिडिफायर : हे अल्ट्रासोनिक व्हायब्रेशन किंवा रोटेशन डिस्कच्या साहाय्याने पाण्याला बारीक थेंबांत बदलतात.
- वॉर्म मिस्ट ह्यूमिडिफायर: हे पाण्याला गरम करून वाफेत बदलतात.
- इव्हॅपोरेटिव ह्यूमिडिफायर: हे एक पंखा वापरून हवेचा प्रवाह पाण्याने भरलेल्या फिल्टरमधून करतात.
एसीसोबत ह्यूमिडिफायर का वापरावा?
एसी वापरताना हवेतील ह्यूमिडिटी कमी होते, ज्यामुळे त्वचा, डोळे, नाक आणि घशात कोरडेपणा येतो. ह्यूमिडिफायर वापरल्याने हवेतील ह्यूमिडिटीची पातळी परत वाढवता येते, ज्यामुळे घरातील वातावरण आरामदायक आणि आरोग्यदायी बनते.
एसीसोबत ह्यूमिडिफायर वापरण्याचे फायदे
- कोरडेपणापासून बचाव: ह्यूमिडिफायर वापरल्याने त्वचा, डोळे, नाक आणि घशात कोरडेपणा येत नाही.
- श्वसनासंबंधी समस्या कमी होतात: ॲलर्जी, अस्थमा आणि खोकला कमी होतो.
- सर्दी आणि फ्लूचे लक्षणे कमी होतात: ह्यूमिडिफायर वापरल्याने सर्दी आणि फ्लूचे लक्षणे कमी होतात.
- लहान मुले आणि वृद्धांसाठी फायद्याचे : ह्यूमिडिफायर वापरल्याने लहान मुले आणि वृद्धांना आराम मिळतो.
- 5घरातील वनस्पतींना फायदा : ह्यूमिडिफायर वापरल्याने घरातील वनस्पती ताज्या आणि निरोगी राहतात.
- धूळ आणि एलर्जीचे कण कमी होतात: ह्यूमिडिफायर वापरल्याने धूळ आणि ॲलर्जीचे प्रमाण कमी होते.
ह्यूमिडिफायर वापरताना लक्षात ठेवावयाच्या गोष्टी
- आपल्या खोलीच्या साईजनुसार योग्य ह्यूमिडिफायर निवडा.
- ह्यूमिडिफायर नियमित साफ करा जेणेकरून बुरशी आणि बॅक्टेरिया निर्माण होणार नाही.
- कूल मिस्ट ह्यूमिडिफायर वापरताना डिस्टिल्ड वॉटर वापरा.
- हवेतील ह्यूमिडिटीची लेव्हल 40% ते 60% दरम्यान ठेवा.
- अतिरिक्त ह्यूमिडिटीपासून बचाव करा
ह्यूमिडिफायर वापरल्याने तुमचे घर अधिक आरामदायक आणि निरोगी होऊ शकते. एसी वापरताना ह्यूमिडिफायर वापरणे महत्त्वाचे आहे.