Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
विनय कुमार साहू (२८) नावाचा तरुण सरकारी नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करत होता. त्यानं छत्तीसगड लोकसेवा आयोगाच्या परीक्षाही दिल्या. पण प्रत्येकवेळी त्याला अपयश आलं. त्यामुळे साहूनं सरकारी नोकरीचा नाद सोडला आणि तो भाजी मंडई परिसरात ग्राहकांचे मोबाईल चोरु लागला. याशिवाय तो लहानमोठ्या चोऱ्या करायचा. साहू त्याच्या परिचयाच्या परिसरातच चोऱ्या करत होता.
दुर्गच्या अहिवारा परिसरात राहणाऱ्या साहूनं ज्या दाम्पत्याचे शरीरसंबंध मोबाईलमध्ये गुपचूप चित्रित केले, त्या घरात त्यानं आधी दोनदा चोरी केली होती. तिसऱ्यांदाही आपण यशस्वी होऊ असा विश्वास त्याला होता. रात्री घरात घुसलेला साहू चोरीसाठी शोधाशोध करत होता. तितक्यात त्याला एका खोलीत दाम्पत्य शरीरसंबंध ठेवताना दिसलं. साहूनं खिडकीडजवळ लपून दोघांचा व्हिडीओ चित्रित केला. त्यासाठी त्यानं चोरी केलेला मोबाईल वापरला.
दुसऱ्या दिवशी दाम्पत्याला एका अज्ञात नंबरवरुन व्हॉट्सऍपवर मेसेज आला. आपलाच व्हिडीओ पाहून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. यानंतर दाम्पत्याला १० लाख रुपयांची मागणी करणारा कॉल आला. पैसे न मिळाल्यास व्हिडीओ व्हायरल करु, अशी धमकी त्यांना मिळाली. दाम्पत्यानं पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीला शोधण्यासाठी तपास पथक तयार केलं. सायबर सेलनं मोबाईल नंबर ट्रॅक केला आणि आरोपीला बेड्या ठोकल्या. पोलिसांनी अटक करेपर्यंत आरोपी त्याच नंबरचा वापर करत होता. पोलिसांना त्याच्याकडे ३ मोबाईल आणि सिम कार्ड सापडले.