Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
पिंपरी चिंचवड पोलिसांनी ४ कोटींची फसवणूक झालेले गुन्हे केले उघड…
पिंपरी चिंचवड (प्रतिनिधी) – रावेत येथील फिर्यादी यांना मेटल कॉईन्समध्ये गुंतवणूक केल्यास तिप्पट परतावा मिळेल असे आमिष दाखवले. त्यानुसार फिर्यादी यानी विनविन कार्पोरेशन कंपनीमध्ये वेळोवेळी दोन कोटी १० लाख रुपये गुंतवले. मात्र परतावा मिळाला नसल्याने फिर्यादी यांनी रावेत पोलीस ठाण्यात सोनी साह या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला. तसेच वाकड येथील फिर्यादी यांची बनावट ॲपद्वारे चालणा-या शेअर मार्केटमध्ये ९९ लाख रुपयांची फसवणुक करुन फसवणुक रक्कम फॉरेन करन्सीमध्ये रुंपातरीत करुन देणा-या फॉरेक्स कंपनीचे संचालक यांना तसेच ऑनलाईन टास्क फ्रॉडद्वारे फिर्यादी यांची ८९ लाख ६१ हजार रुपयांची आर्थिक फसवणुक करणा-या आरोपींना सायबर सेल पिंपरी चिंचवड यांनी मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारावर शिताफीने अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी ४ कोटींचा फसवणुकीचा गुन्हा उघडकीस आणून आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.
या बाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रावेत येथिल फिर्यादी हे फेसबुक अंकाउटवर सर्फिंग करत असताना त्यांना मेटल कॉईन्समध्ये गुंतवणुक केल्यास तिप्पट परतावा मिळेल अशा आशयाची लिंक दिसली त्यानंतर फिर्यादी यांनी सदर लिंकवर क्लिक केले असता फिर्यादी यांना विनविन कार्पोरेशन नावाची कंपनी मेटल कॉईन्स मध्ये गुंतवणुक करुन परतावा देते अशी माहिती देण्यात आली. त्यानंतर फिर्यादी यांनी सदर कंपनीमध्ये वेळोवेळी ०२ कोटी १० लाख रुपये विनविन कार्पोरेशनचे इसम नामे सोनी साह, व्हॉटसअपवर धारक यांनी गुंतवणुक करावयास लावुन सदरची रक्कम अथवा तिप्पट परतावा फिर्यादी यांनी वेळोवेळी मागणी करुनही न दिल्याने फिर्यादी यांनी रावेतपोलीस स्टेशन येथे गु.र.क्र. २६८/२०२४ भादंवि कलम, ४१९,४२०,३४ आयटी ॲक्ट कलम ६६- डी प्रमाणे तक्रार दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयाचा तपास वपोनि. वैभव शिंगारे सायबर सेल पिंपरी चिंचवड यांचे मार्गदर्शनाखाली सहा.पो.नि. प्रवीण स्वामी, पोउपनि सागर पोमण, पोउपनि रविंद्र पन्हाळे व पथक करत होते. दाखल गुन्हयातील फिर्यादी यांनी फसवणुक प्रकरणातील २०,०००००/- रक्कम इंडसइंड बँकेच्या अकाऊंटवर पाठविली होती. त्या रकमेपैकी ९२१५९७/- रु हे एच.डी.एफ.सी बँकेच्या अकाऊंटवर पाठवण्यात आले होते. त्या अकाऊंटवरुन ५०००००/- रु. रक्कम ही एच.डी.एफ.सी बँकेच्या अकाऊंटवर पाठविण्यात आली होती.
त्या बँक अकाऊंट धारकाची माहीती घेतली असता सदरचे बँक अकाऊंट अनिकेत अर्जुन पवार, जे.एस.पी.एम कॉलेज, ०२ नंबर गेट, फ्लॅट नंबर २०५, देवराई सोसायटी, न-हे, पुणे. याच्या नावावर असल्याने त्याचेकडे तपास केला असता सदर रक्कम त्याला त्याचा मिञ व आरोपी नामे रोहीत विकास पवार रा. जळगाव रोड, लक्ष्मी नगर, कोरेगाव सातारा, सध्याचा पत्ता साईनाथ मंदीर शेजारी, शास्त्री नगर, कोथरुड याने त्याचे एच.डी.एफ.सी बँकेच्या अकाऊंट मधुन पाठवले असल्याचे सांगीतले. सदरची रक्कम आरोपी रोहीत पवार याने आरोपी नामे – मुजफर मक्सुद बागवान रा. आंबेगाव पठार, लेन नंबर ०३, काञज, पुणे. याला देऊन त्या बदल्यात त्याच्याकडुन यु.एस.डी.टी ही क्रिप्टो करन्सी घेतली आहे. दाखल गुन्हयामध्ये आरोपी रोहित पवार व मुजफर बागवान यांचा सहभाग निष्पन्न झाल्याने त्यांना पुढील तपासकामी रावेत पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आले आहे. तसेच वाकड पोलीस स्टेशन गु.र.क्र.५६०/२०२४ भादंवि कलम, ४०६,४२०,३४ आयटी ॲक्ट कलम ६६- सी,६६- डी मधील फिर्यादी यांची बनावट ॲपद्वारे चालणा-या शेअर मार्केटमध्ये ९९ लाख रुपयांची फसवणुक झालेबाबत दाखल गुन्हयाचा संमातर तपास सायबर सेल, पिंपरी चिंचवड कडील सपोनि प्रवीण स्वामी हे करत असताना दाखल गुन्हयामधील फसवणुक रक्कम रिषभ एंटरप्रायझेस नावाचे बैंक अकाउंटवरुन ग्लोबल हॉरिझॉन इंटरनॅशनल कंपनीचे अकाउंटवर गेल्याचे निष्पन्न झाली व सदरची रक्कम गोम्स फॉरेक्स सर्विसेस इंडिया प्रा.लि. व चिरायु फॉरेक्स कंपनी प्रा.लि. या फॉरेक्स करन्सी देणा-या कंपनीचे अकाउंटवर पाठवल्याचे निष्पन्न झाले. सदर फसवणुक रक्कमेचे बदल्यामध्ये गोम्स फॉरेक्स सर्विसेस इंडियाचे प्रोप्रा स्टिफन गोम्स, वय-५२ वर्ष रा. लंबोदर पार्क ए विंग, १०४, खारेगाव कळवा ठाणे व चिरायु फॉरेक्स कंपनी प्रा.लि. चे कमलेश थानाराम माळी, (वय-३२ वर्ष), व्यवसाय-फॉरेक्स, रा.ग्लेसिया, ए विंग, ५०२, टेंभी नाका, ठाणे वेस्ट यांनी युएसडीटी ही फिजिकल करन्सी अनोळखी इसमांना दिली आहे. दाखल गुन्हयामध्ये स्टिफन गोम्स व कमलेश माळी यांनी फसवुणक रक्कम आहे हे माहित असुन देखील ती स्वीकारुन त्या बदल्यामध्ये युएसडीटी ही करन्सी दिली आहे. त्यावरुन गोम्स व माळी यांचा दाखल गुन्हयामध्ये सहभाग निष्पन्न झाल्याने त्यांना पुढील कायदेशीर कारवाईकामी वाकड पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
पिंपरी चिंचवड गु.र.क्र. ५४०/२०२४ भादंवि कलम, ४०६,४२०,३४ आयटी अॅक्ट कलम ६६-सी,६६- डी मधील फिर्यादी यांची ऑनलाईन टास्क फ्रॉडद्वारे एकुण ८९,६१,१८९/- रुपयांची आर्थिक फसवणुक झालेबाबत दाखल गुन्हयाचा संमातर तपास सायबर सेल, पिंपरी चिंचवड हे करत असताना पोशि संतोष घाडगे यांनी तांत्रिक तपासाद्वारे दाखल गुन्हयातील रक्कम ही मिरा भाईंदर येथील अकाउंट धारक १) कन्हैया वकिल कनोजिया (वय ३६ वर्षे) रा.बी-२०५, नर्मदा पॅराडाईज, बिल्डींग नं. ४, १०० फुटी रोड, ठाणे ईस्ट, याचे असल्याची माहिती मिळाल्याने त्याबाबत मिरा भाईंदर वसई विरार येथे जाऊन तपास केला असता आरोपी कन्हैया याने आरोपी १) आदिल अन्वर खान (वय २१ वर्षे), रा.न्यु अनामिका रुम नं. ०२, हैदी चौक, नयानगर मिरारोड पुर्व, मुंबई व २) रियान अर्शद शेख (वय २२ वर्षे) रा.न्यु महानगर गॅस, गौरव गॅस एजंसी, सि विंग ०७ वा मजला, फ्लॅट नं.७०१, पिन्नाकोवा साईड, मिरारोड, पुर्व यांना काढुन दिल्याचे असल्याचे सांगितल्याने त्यांना दाखल गुन्हयाचे अनुषंगाने पुढील तपासकामी पिंपरी पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आले आहे. दाखल गुन्हयातील आरोपी कन्हैया कनोजिया याचे ०७ बँक खात्यावर पुर्ण भारतभरामधुन ५० तक्रारी प्राप्त आहेत. तसेच आरोपी आदिल खान याचे एचडीएफसी बँक खात्यावर एकुण ०३ तक्रारी प्राप्त असुन त्यापैकी एक तक्रार पुणे शहर पोलीस आयुक्तालयामधील आहे. दाखल गुन्हयातील आरोपी यांनी अंदाजे ३ ते ४ कोटी रुपये रक्कमेचा अपहार केला असुन त्याबाबत अधिक तपास चालु आहे.
सदरची कारवाई विनयकुमार चौबे, पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, वसंत परदेशी, अपर पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, संदिप डोईफोडे पोलीस उपआयुक्त, गुन्हे पिंपरी चिंचवड, विशाल हिरे, सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे, पिंपरी चिंचवड यांच्या मार्गदर्शनाखाली वपोनि वैभव शिंगारे, सपोनि प्रविण स्वामी, पोलीस उपनिरीक्षक सागर पोमण, पोउपनि नितीन गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक रविंद्र पन्हाळे, पोहवा दिपक भोसले, पोशि. बिच्चेवार, पोशि अतुल लोखंडे, पोशि श्रीकांत कबुले, पोशि सौरभ घाटे, पोशि अशोक जवरे, पोशि कृष्णा गवळी, पोशि. रमेश कारके, पोशि. सचिन घाडगे, पोशि अभिजित उकिरडे, पोशि स्वप्निल खणसे, पोशि. सुरज शिंदे, पोशि. आनंद मुठे, पोशि. अनिकेत टेमगिरे, पोशि. बळीराम नवले, पोशि. बनसोडे (सर्व नेमणुक सायबर सेल) यांच्या पथकाने केली आहे.
व्हॉटस्अपद्वारे किंवा इतर कोणत्याही सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर आलेल्या फसव्या लिंकला क्लिक करुन ऑनलाईन टास्क फ्रॉड, शेअर ट्रेडिंग फ्रॉड, फेडेक्स पार्सल फ्रॉड यासारख्या सायबर गुन्हयांना बळी पडु नये याकरिता दक्षता घेण्याचे आवाहन विनयकुमार चौबे पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांनी केले आहे.