Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Lucky Zodiac Sign, July 2024 : गुरू आणि मंगळचा दुर्लभ योग ! मेषसह या आहेत जुलै महिन्यातील 5 भाग्यवान राशी !
मेष – करिअरमध्ये प्रगतीचे चांगले योग
मेष राशीच्या लोकांना जुलै महिना उत्तम सिद्ध होणार आहे. ११ जुलैपर्यंत मंगळ स्वतःची रास असलेल्या मेषमध्ये राहून या राशींच्या लोकांच्या प्रगतीत धनलाभ देईल. या काळात तुम्हाल करिअरमध्ये पदोन्नती मिळण्याचे चांगेल योग आहेत. तुम्ही करिअरमध्येही चांगेल प्रदर्शन कराल. मंगळ तुम्हाला योग्य निर्णय घेण्याची ऊर्जा देईल. तुमची सर्व थांबलेली कामे या महिन्यात पूर्ण होतील. यानंतर १२ जुलैला मंगळ तुमच्या राशीतील दुसऱ्या भावात गोचर करत, गुरूसोबत युती करेल. अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला लाभ आणि प्रगतीच्या संधी मिळतील. सोबतच तुमचे उच्च प्रतिष्ठीत व्यक्तींशी संबंध निर्माण होतील.
सिंह – उच्चाधिकाऱ्यांकडून मानसन्मान

जुलै महिना सिंह राशीच्या लोकांना शुभ फलदायी ठरणार आहे. कार्यक्षेत्रात तुम्हाला उच्चाधिकाऱ्यांकडून मानसन्मान मिळेल. व्यापार आणि नोकरीत प्रगतीचे योग आहेत. कुटुंबात सुखशांती आणि समृद्धी राहील. मित्रांमुळे काही समस्या या महिन्यात निर्माण होतील, पण अखेरीस काही प्रतिष्ठीत व्यक्तींची मदत मिळाल्याने कामे सुधारत जातील. चांगला धनलाभ मिळवण्यात यशस्वी व्हाल.
वृश्चिक – अविवाहितांसाठी लग्नाचे योग

वृश्चिक राशीसाठी हा महिना संमिश्र म्हणता येईल. तुमच्या कामकाजात काही अडथळे येतील आणि विघ्नही निर्माण होतील, तुम्हाला प्रत्येक कार्यात यश मिळेल. व्यापाऱ्यांकडे फार जास्त काम असेल, ज्यामुळे तुम्हाला चांगले लाभ मिळतील. जोडीने व्यापारात काही परिवर्तनाचा विचारही बनेल. हे परिवर्तन तुमच्यासाठी सकारात्मक राहील. या महिन्यात प्रवासाला जाण्याचे नियोजन कराल. प्रिय भावांची भेट होईल. महिना अखेरीस अविवाहितांच्या लग्नाचे योग आहेत. जे विवाहित आहेत, त्यांना पत्नीकडून लाभ मिळतील. तुम्हाला शुभवार्ता मिळेल.
मकर – मान, प्रतिष्ठा वाढेल

मकर राशीच्या जातकांना जुलै महिना वरदान ठरणार आहे. या महिन्यात सुरुवातीला धनलाभ आणि प्रगतीचे योग आहेत. तुम्ही लक्झरी प्रकारातील वस्तूंवर खर्च कराल. विवाहितांना पत्नी आणि संततीकडून प्रसन्नता मिळाल. पण १६ जुलैनंतर थोड्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. घर आणि समाजात मान, प्रतिष्ठा राहील.
कुंभ – मित्रांच्या सहकार्याने मोठा लाभ

कुंभ राशीच्या लोकांना हा महिना शानदार सिद्ध होणार आहे. या महिन्यात मानसन्मान, प्रतिष्ठा यात वाढ होईल. या महिन्यात तुम्हाला विदेशातील व्यवहारातून लाभ मिळेल. या महिन्यात तुमची कठीणातील कठीण कामेही पूर्ण होतील. यामध्ये तुम्हाला मित्रांचे पूर्ण सहकार्य मिळेल. मित्रांच्या सहकार्यामुळे मोठा लाभ होईल. प्रकृतीबद्दल निष्काळजी राहू नका असा सल्ला राहील.