Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
मुंबई,दि.२८:- पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणात राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत माहिती दिली.
देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितलं. “अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचा नमुना घेतला होता. ज्यावेळी रक्ताच्या नमुन्यात अल्कोहल नाही, लक्षात आलं, त्यावेळी पोलिसांना स्ट्राइक झालं, की, काहीतरी गडबड आहे. पोलिसांनी तात्काळ त्याचा डीएनए घेतला. रक्ताचा नुमना त्या डीएनएशी मॅच केला. वडिलांचा डीएनए घेतला तो मॅच केला. आरोपीचा डीएनए रक्ताच्या नमुन्याशी मॅच होत नव्हता. पोलिसांनाी तात्काळ कारवाई केली. डॉक्टरांना अटक केली” अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
“डॉक्टरने 3 लाख रुपये घेऊन रक्ताचे नमुने बदलल्याच मान्य केलं. या सर्व बाबी रेकॉर्डवर आल्या पाहिजेत. आरोपपत्र दाखल केलं. अपघाताच्यावेळी गाडीत लॉक झालेला स्पीड 110 किमी आहे” असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. “घरापासून सीसीटीव्ही फुटेज जप्त केलं. पहिला ज्या बारमध्ये गेला, तिथलं सीसीटीव्ही फुटेज, फूड बील जप्त केलय. दुसऱ्याबारमध्ये गेला तिथलं सीसीटीव्ही फुटेज आहे. आता लीगल आणि टेक्निकल पुराव्यांची कमतरता नाहीय” असं फडणवीस म्हणाले.
“आपला मुलगा प्रौढ नाहीय हे माहित असूनही वडिलांनी त्याला गाडी चालवायला दिली. म्हणून ज्युवेनाईल जस्टिस कायद्यानुसार त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. ज्या मॅनेजर्सनी त्यांना दारु दिली, त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झालाय. आरोपीच्या आजोबांनी ड्रायव्हरला गुन्हा अंगावर घ्यायला सांगितला. तो पोलिसांकडे गेला, मी गाडी चालवत होता म्हणून सांगितलं. पण पोलिसांनी मान्य केलं नाही. आजोबांनी ड्रायव्हरला कोंडून ठेवलं. पण त्याने गुन्हा मान्य केला नाही. वडिल आणि आजोबांवर किडनॅपिंगची केस लावली आहे” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
“आरोपीला 3 वाजता आणलं, त्याला लगेच मेडीकलला पाठवायला पाहिजे होतं. पण साडेआठला पाठवलं. वरिष्ठांना तात्काळ कळवायला पाहिजे होतं. पण ते कळवलं नाही. याचा सगळा रेकॉर्ड केस डायरीमध्ये आहे. ज्या पोलीस अधिकाऱ्याने ड्युटी नीट केली नाही त्याला निलंबित केलय.
पुण्यातील कल्याणनगर येथील पोर्शे कार अपघात प्रकरणाचे पडसाद आज दि २८ रोजी विधानसभेमध्येही उमटले. या प्रकरणावरुन विरोधी पक्ष आक्रमक झाला. याला उत्तर देताना गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “पुण्यातील ७० पबचे परवाने रद्द केले गेले आहेत.
आज विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. पुण्यातील कल्याणनगर येथील पोर्शे कार अपघात प्रकरणाचे पडसाद विधानसभेमध्येही उमटले. या प्रकरणासंबधी लक्षवेधी प्रश्नावर चर्चा झाली. विरोधी पक्ष या प्रकरणावरुन आक्रमक झाल्याचे दिसून आले. यावेळी बोलत असताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस उत्तर दिले.
अल्पवयीन मुलाच्या तपासणीला पोलिसांनी विलंब लावला. कामात दिरंगाई केल्याबद्दल पोलिसांच निलंबनही करण्यात आले आहे. पुण्यातील ७० पबचे परवाने रद्द केले गेले आहेत. पुण्यातील पबवर करडी नजर ठेवली जात आहे.