Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
अवैधरित्या सुगंधीत तंबाखुजन्य पदार्थ व पान मसाला पदार्थाची वाहतुक करणाऱ्यावर सावनेर पोलिसांची कारवाई,एकूण ११,०२,७५०/- रू चा मुद्देमाल केला जप्त….
सावनेर(नागपुर)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,
दि. (२५)रोजी सहा. पोलिस अधिक्षक तथा उपविभागीय पोलिस अधिकारी,सावनेर यांना मिळालेल्या गुप्त बातमीदाराचे बातमी वरून मध्यप्रदेशातुन मोठ्या प्रमाणात सुगंधीत तंबाखु गुटख्याची वाहतुक होणार आहे अशा बातमीवरुन कार्यवाही करण्यासाठी पोलिस स्चेशन सावनेर येथील पोनि रविन्द्र मानकर यांना आदेशीत केले होते त्यानुसार त्यांनी त्यांचे अधिनस्त असलेले मसपोनि मंगला मोकाशे, पो. हवा. राजेश हावरे, नापोशि कपोल तभाणे,पोशि अंकूश मुळे,सतिश देवकते यांचे सह पाटणसावंगी टोलनाका येथे नाकाबंदी केली असता छिंदवाडा रोड कडून नागपूर जाणाऱ्या रोडवर एक इनोवा गाडी क्र एम एच – ४९ / बी ८३७२ ही संशयीत रित्या येतांना दिसल्याने तिला थांबवून त्याचा चालक प्रज्वल विलासगाव ढोरे वय २४ वर्ष रा तुकडोजी पुतळा चौक रघुजी नगर नागपुर याला ताब्यात घेवून त्याला विचारपुस करून त्याचे गाडीची तपासणी केली असता, इनोवा गाडी मध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला सुंगधीत तंबाखु व पान मसाला असलेल्या एकुण ६६ बोरी आणी ५ बॉक्स एकूण वजन ५२१.७६ कि.ग्रॅ किमंत ६,०२,७५०/- रू चा सुगंधित तंबाखू व इनोव्हा गाडी कमांक एम एच – ४९/ बी ८३७२ किंमती ५,००,०००/–रू असा एकूण ११,०२,७५०/- रू. चा मुददेमाल जप्त केला
सदर आरोपी हा त्याचे मित्रांचे सांगणेवरून सुगंधित तंबाखुची अवैधरित्या वाहतूक करतांना प्रत्यक्ष मिळून आल्याने, त्याचेवर पोस्टे सावनेर येथे अपराध कमांक ५९५/२४ कलम २७२, २७३, ३२८, १८८ भादवी सहकलम अन्न व मानके कायदा २००६ अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
सदरची कारवाई ही,पोलिस निरीक्षक हर्ष पोद्दार,अपर पोलिस अधिक्षक रमेश धुमाळ,सहा पोलिस अधिक्षक तथा उपविभागिय पोलिस अधिकारी,सावनेर अनिल मस्के यांचे मार्गदर्शनाखाली
पोलिस निरीक्षक रविंद्र मानकर, मसपोनी मंगला मोकाशे, पोहवा राजेश हावरे, नापोशि कपोल तभाने, पोशि अंकूश मूळे, सतिश
देवकते यांनी केली असून गुन्हयाचा पुढील तपास सपोनी मोकाशे हया करत आहे.