Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
भारत फायनान्स उमरखेड येथील तिजोरी फोडणार्या टोळीस स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेऊन घरफोडीचा गुन्हा केला उघड, एकुन ३,५०,०००/- रु चा मुद्देमाल केला जप्त….
उमरखेड(यवतमाळ) प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,
मागील तिन ते चार महिण्यांपुर्वी उमरखेड येथील भारत फायनान्स चे कार्यालय असलेल्या आनंद नगर परिसरात बंद घर अज्ञात आरोपींनी फोडुन तेथील लोखंडी तिजोरी चोरुन नेल्याची घटना घडली होती. सदर प्रकरणी पोलिस ठाणे उमरखेड येथे अज्ञात आरोपीतांविरुध्द अपराध क्रमांक १३०/२०२४ कलम ४५७,३८० भादवि प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता व सदर गुन्हयाचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडुन सुरु होता.
त्याअनुषंगाने दिनांक २७/०६/२०२४ रोजी स्थानिक गुन्हे शाखेकडील एक पथक उमरखेड उपविभागात अवैध धंदे विषयक कारवाई, व गुन्हे उघडकीस आणने व पाहिजे फरार असलेले आरोपींचा शोध घेणे संबधाने उमरखेड परिसरात पेट्रोलींग करीत असतांना पथकास गोपनीय माहीती मिळाली की आनंद नगर परिसरातील घरफोडीची घटना उमरखेड येथील रेकॅार्डवरील आरोपी शेख निसार शेख उस्मान रा. शिवाजी वार्ड उमरखेड व त्याचे साथीदारांनी केली असे निष्पन्न झाले
तसेच आता शेख निसार हा उमरखेड बसस्थानका जवळ थांबुन असुन त्याने राखाडी रंगाचे शर्ट परिधान केले आहे. वरुन पथकाने प्राप्त माहितीची शहानिशा करणे साठी तात्काळ सदर ठिकाणी जावुन माहिती प्रमाणे वर्णनाचे इसमाचा शोध घेत असतांना वर्णना प्रमाणे इसम बसस्थानक उमरखेड परिसरात मिळुन आल्याने त्यास त्याचे नांव गांव विचारले असता त्याने त्याचे नांव १) शेख निसार शेख उस्मान वय ३२ वर्ष, रा. शिवाजी वार्ड उमरखेड असे सांगीतल्याने त्यास ताब्यात घेऊन आनंद नगर येथील घरफोडी बाबत विश्वासात घेवून विचारपुस केली असता त्याने गुन्हयाची कबुली दिली
सदची चोरी त्याचे उमरखेड येथील साथीदार आरोपी क्र २) आदील खान मेहबुब खान रा. ताजुपरा वार्ड उमरखेड आरोपी क्र ३) फयाज खान बिस्मीला खान रा. रामरहीम नगर नांदेड रोड उमरखेड आरोपी क्र ४) अब्दुल कद्दुस शेख मुज्जीत रा. एम.के. गार्डन रोड, उमरखेड यांचे सोबत मिळुन केल्याचे व तिजोरीतील पैसे आपआपसात वाटुन घेतल्याचे सांगीतल्याने नमुद सर्व आरोपींना ताब्यात घेवुन त्यांचेकडुन त्यांनी गुन्हयात वापरलेल्या तिन मोटारसायकल व गुन्हयातील रक्कमेतून खरेदी केलेली बुलेट व मोबाईल असा एकुण ३,५०,०००/- रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असुन गुन्हयात आरोपी क्र. ५) शेख अजहर उर्फ शुट शेख अकबर रा. उमरखेड याचाही सहभाग असल्याचे निष्पन्न झाले असुन तो सध्या उमरखेड येथील एका गुन्हयात न्यायालयीन
कोठडीत आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या चारही आरोपींना पुढील कारवाई करीता पोलिस ठाणे उमरखेड यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई ही पोलिस अधिक्षक डॉ. पवन बन्सोड, अपर पोलिस अधीक्षक पियुष जगताप, पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा आधारसिंग सोनोने यांचे मार्गदर्शनात सपोनि गजानन गजभारे, पोउपनि शरद लोहकरे,पोलीस अंमलदार कुणाल मुंडोकार, तेजाब रणखांब, रमेश राठोड, सुभाष जाधव, मोहम्मद ताज, चापोउपनि रेवन जागृत सर्व स्था.गु.शा. यवतमाळ यांनी केली