Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Rajkot Airport Incident: तीन दिवसांत तीन अपघात! दिल्ली, जबलपूरनंतर राजकोट विमानतळाचे छत कोसळले

9

अहमदाबाद : मुसळधार पावसामुळे राजकोट विमानतळाच्या छत कोसळल्याची घटना घडली आहे. राजकोटच्या हिरासरमध्ये एक वर्षापूर्वीच उभारलेल्या या आंतरराष्ट्रीय विमानतळाची पावसाने दैना केल्याचे चित्र आहे. सुदैवाने घटनेत जीवित व वित्त हानी टळली आहे. दिल्ली विमानतळावर देखील शुक्रवारी विमानतळाचे छत कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली होती. दिल्लीमध्ये पावसाचा हाहाकार शुक्रवारी पाहायला मिळाला त्याप्रमाणेच गुजरातमधील काही भागांना देखील पावसाने झोडपले आहे. यामध्ये राजकोटच्या विमानतळावर ही घटना घडली आहे.

विमानतळ प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, छतावर पावसामुळे पाणी साचले होते. त्यामुळे ही घटना घडली आहे. पण सुदैवाने यात कोणीही जखमी झालेले नाही. शुक्रवारी दिल्लीच्या IGI विमानतळावर छत कोसळले आणि या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला होता. तर सहा जण गंभीर जखमी झाले होते. त्याच्या दुसऱ्या दिवशीच राजकोटमधून एक वर्षापूर्वीच बांधलेल्या नूतन विमानतळाच्या बाहेरील छताचा भाग कोसळला आहे.

विमानतळाच्या ज्या भागात छत कोसळले, तिथे प्रवाशांच्या पीक अप अँड ड्रॉपची सुविधा आहे. सुदैवाने ही घटना घडली तेव्हा त्याठिकाणी कोणीही नव्हते. त्यामुळे जीवितहानी टळली आहे. गुजरात राज्याला जोरदार पावसाने तडाखा दिला आहे. मुसळधार पावसामुळे काही भागांना मोठा फटका बसला आहे. यामुळे राज्यातील पावसामुळे प्रभावित झालेल्या भागांत एनडीआरएफची सात पथके तैनात करण्यात आली आहेत.
दिल्लीत पावसाचा हाहाकार! विमानतळाचे छत कोसळले, एकाचा मृत्यू पाच जण जखमी
राजकोटमधील या विमानतळासाठी केंद्र सरकारकडून भरीव निधी मंजूर करण्यात आला होता. ज्याची किंमत जुलै २०१९ पर्यंत २६५४ कोटींच्या घरात गेली आहे. २०२३ च्या जून महिन्यात विमानतळाचे बांधकाम पूर्ण झाले होते तर जुलैमध्ये ते लोकांच्या सेवेसाठी खुले करण्यात आले. राजकोट विमानतळाची क्षमता अशी की, या विमानतळाची सात गंतव्य स्थानांशी कन्टेक्टिव्हिटी आहे. या विमानतळातून फक्त एअर इंडिया आणि इंडिगो ची विमानं आपली उड्डाण करत असतात.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.