Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

How To measure Land Area: मोबाइलवरून करा शेती किंवा जमिनीची मोजणी; आत्ताच डाउनलोड करा हे अ‍ॅप्स

7

जर तुम्ही नवीन जमीन खरेदी करत असाल किंवा तुम्हाला तुमच्या शेतजमिनीची मोजणी करायची असेल तर हे काम तुम्ही मोबाइलवरून देखील करू शकता. यासाठी फक्त मोबइलमध्ये काही अ‍ॅप्स डाउनलोड करावे लागतील. ज्यांच्या मदतीनं तुम्ही जमीन किंवा प्लॉटच्या दिशेची देखील माहिती मिळवू शकता. या आर्टिकलमध्ये मोबाइलवरून जमीन मोजण्याची पद्धत जाणून घेऊया तसेच दिशा जाणून घेण्याची पद्धत देखील पाहू.

जमीन किंवा शेतीची मोजणी करण्यासाठी तुम्ही काही अ‍ॅप्स वापरू शकता. चला पाहूया हे अ‍ॅप्स आणि ते कसे वापरायचे.
90 टक्के लोकांना माहित नाही बंद करण्याची योग्य पद्धत; जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रोसेस, तुमचा लॅपटॉप ठेवा सुरक्षित

GPS Fields Area Measure

जीपीएस फील्ड्स एरिया मेजर अ‍ॅप गुगल प्ले स्टोरवर फ्री आणि पेड दोन्ही व्हर्जनमध्ये उपलब्ध आहे. हे अ‍ॅप एक कोटींपेक्षा जास्त लोकांनी डाउनलोड केलं आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून एरिया मेजर करण्यासाठी पुढील स्टेप को फॉलो करा.

  • सर्वप्रथम GPS Fields Area Measure गुगल प्ले स्टोरवरून अँड्रॉइड डिव्हाइसवर डाउनलोड करा. हे अ‍ॅप आयओएस डिवाइससाठी पण उपलब्ध आहे, जे अ‍ॅप स्टोरवरून डाउनलोड केलं जाऊ शकतं.
  • अ‍ॅप ओपन करा आणि जीपीएस वापरण्याची परवानगी द्या.
  • इथे जमीन किंवा शेत मोजण्यासाठी दोन मोड मिळतात- मॅन्युअल मेजरिंग आणि जीपीएस मेजरिंग.
  • जमीन मोजण्यासाठी ‘क्रिएट न्यू’ वर क्लिक करा. त्यानंतर एरिया, डिस्टन्स आणि पीओआयचा ऑप्शन मिळेल. एरिया मोजण्यासाठी यातील एक एकाची निवड करा.
  • त्यानंतर तुम्हाला मॅन्युअल मेजरिंग आणि जीपीएस मेजरिंग मधून एक पर्याय निवडावा लागेल.
  • मॅन्युअल मेजरिंगमध्ये जी जमीन मोजायची आहे ती निवडा, तसेच जीपीएस मेजरिंगमध्ये त्या जमिनीवर जाऊन एका पॉईंट वरून पॉईंट पर्यंत मोबाइल घेऊन चालावं लागेल आणि हे अ‍ॅप सर्व रेकॉर्ड करतं. त्यानंतर जमिनीचा आकार काढला जातो. त्यानंतर तुम्ही ही मोजणी सेव्ह आणि शेयर देखील करू शकता.

अशाप्रकारे तुम्ही GPS Fields Area Measure Tool, Easy Area : Land Area Measure, Gps Area Calculator आणि GPS Land Field Area Measure हे अ‍ॅप्स देखील जमीन किंवा शेती मोजण्यासाठी वापरू शकता.

नोटः वरील अ‍ॅप्स मध्ये जमीन किंवा शेती मोजण्यासाठी जीपीएस टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो. ही मोजणी 100 टक्के अचूक असण्याची खात्री देता येत नाही. या मोजणीचा वापर कायदेशीर बाबींसाठी करता येणार नाही परंतु अंदाज लावण्यासाठी तुम्ही हे अ‍ॅप्स वापरू शकता.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.