Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Offline Map Apps: भुशी डॅम सारखी परिस्थिती ओढावू नये म्हणून आत्ताच डाउनलोड करा हे अ‍ॅप्स; पावसाळी ट्रेक होईल सोपं

10

पावसाळा सुरु झाला आहे आणि लोक धबधबे, धरणं आणि किल्ल्यांवर जात आहेत. त्यामुळे अनेक दुर्घटना घडत आहेत. अशीच एक दुर्घटना अलीकडे झाली आहे ज्यात भुशी धरण परिसरातील धबधब्याच्या प्रवाहात एकाच कुटुंबातील सात जण वाहून गेले आहेत. तसेच ट्रेकिंगला गेलेले लोक देखील बऱ्याचदा वाट चुकतात आणि अडकतात, अश्या घटना देखील घडल्या आहेत. या दुर्घटना बऱ्याचदा नवख्या ट्रेकर्स सोबत घडतात, कारण त्यांना ट्रेकची वाट माहित नसते. परंतु सध्या असे अनेक अ‍ॅप्स आहेत जे ट्रेकिंग रूट दाखवतात, त्यामुळे चुकण्याची किंवा अडकण्याची शक्यता कमी होते. चला पाहू त्यांची माहिती.

Maps.me

नावावरून Maps.me हे मॅप अ‍ॅप आहे जे ऑफलाइन देखील वापरता येतं. यात तुम्ही राज्याचा मॅप डाउनलोड करू शकता. यात अनेक ट्रेकिंग ट्रेल्सच्या रूट दिसतात, तसेच कॅम्प साईट देखील दाखवल्या जातात. तसेच दोन ट्रेकिंग पॉईंट मधील अंतर देखील दाखवलं जातं. तसेच अल्टीट्युड किती आहे ते टेरेन लेयरसह दिसतं.
How To measure Land Area: मोबाइलवरून करा शेत किंवा जमिनीची मोजणी; आत्ताच डाउनलोड करा हे अ‍ॅप्स

Google Maps

हे सर्वात लोकप्रिय मॅप अ‍ॅप आहे, परंतु यातील काही फीचर्स युजर्सना माहित नाहीत. ज्यात टेरेन आणि सॅटेलाइट मॅप्सचा समावेश आहे. तसेच तुम्ही ऑफलाइन मॅप डाउनलोड करून ठेऊ शकता ज्यामुळे नेटवर्क नसलेल्या ठिकाणी देखील तुम्हाला मॅप वापरता येईल. परंतु टेरेन मॅपचे वाचन करणे येत असल्यास तुम्ही याचा वापर ट्रेकिंगसाठी देखील करू शकता.

Durg: Offline Navigation

दुर्ग हे महाराष्ट्रातील ट्रेकसाठी खास बनवलेलं अ‍ॅप्लिकेशन आहे. ज्यात धबधबे, किल्ले आणि ट्रेकिंग ट्रेल्सचे ऑफलाइन मॅप्स मिळतात. तुम्ही डिफिकल्टी लेव्हल देखील पाहू शकता आणि त्यानुसार ट्रेक निवडू शकता. तसेच यात ट्रेक करताना काय पाहावे याची देखील थोडक्यात माहिती देण्यात आलेली आहे.

AllTrails: Hike, Cycle & Run

हे देखील एक लोकप्रिय ट्रेक आणि ट्रेल मॅप अ‍ॅप आहे. यात तुम्ही तुमच्या जवळचे ट्रेक रूट शोधू शकता. इतर ट्रेकर्सनी दिलेले रिव्ह्यू पाहू शकता. यात तुम्ही मित्र बनवू शकता आणि त्यांना फॉलो करू शकता. ट्रेकिंग सोबत सायकलिंग आणि अ‍ॅथलिट देखील हे अ‍ॅप वापरू शकतात.

नोट: हे अ‍ॅप जरी मोबाइलमध्ये असले तरी पावसाळ्यात धोकादायक ट्रेक टाळावेत किंवा एक्सपर्टना सोबत घेऊन जावे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.