Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
आर्थिक राशिभविष्य 2 जुलै 2024: योगिनी एकादशीसह त्रिपुष्कर योग, मेष, सिंहसह या 5 राशींचे उत्पन्न वाढणार ! नोकरी आणि व्यवसायात धनलाभ !
मेष राशीला मिळेल व्यापारात यश
व्यापारात यश मिळेल आणि तुम्हाला नशिबाची साथ राहील. या कारणाने तुम्ही खुलून खरेदी कराल. कार्यक्षेत्रात तुम्ही प्रामाणिकपणे काम करला. त्यामुळे भविष्यात तुम्हाला लाभ होतील. उत्पन्न वाढल्याने कुटुंबातील सदस्यही आनंदात असतील.
वृषभ राशींने कार्यस्थळी राहावे सतर्क
आर्थिक राशीच्या लोकांना नशिबाची साथ राहील. सध्या सुरू असलेल्या व्यापाराचा विस्तार होईल. त्रिपक्षीय भागीदारीची स्थिती राही. पण खासगी बाबतीत त्रिपक्षीय संबंध अनुकूल ठरणार नाहीत. तुम्हाला साधनांची जुळणी करून स्वतःची आर्थिक स्थिती सशक्त करावी लागणार आहे, तरच प्रतिष्ठा टिकून राहील. कार्यक्षेत्रात काही चोरी होण्याची शक्यता दिसते, तरी सतर्क राहावे.
मिथुन राशीला मिळेल सहकार्य
तुमच्या सर्व आकांक्षा जतन करून ठेवा कारण तुम्ही ज्या अपेक्षा करत आहात, त्या सगळ्यांची पूर्तता न झाल्याने तुम्ही हाताश होऊ शकता. कार्यस्थळी काही अडचणी येऊ शकतात, अशात वृश्चिक राशीची व्यक्ती तुमच्या मदतीला येईल.
कर्क राशीच्या लोकांना करिअरमध्ये यश
कार्यक्षेत्रात तुम्ही युवकांना प्रोत्साहन देण्यात यशस्वी व्हाल. तुमची मुलगी तिच्या करिअरमध्ये स्वतंत्र निर्णय घेईल. काही चतुर मित्र तुमच्या उदार स्वभावाचा फायदा घेतील, तरी सतर्क राहावे. करिअरमध्ये यशामुळे मन आनंदात असेल.
सिंह राशीचे लोक यशाला गवसणी घालतील
दूसऱ्यांकडून फार अपेक्षा ठेऊ नका, अन्यथा तुम्हाला फार संघर्ष करावा लागेल. कार्यस्थळी कोणाशीही भावनिक गुंतवणूक होणार नाही याची दक्षता घ्या. तुम्हाला आज थोडे जड वाटू शकते. व्यावसायिक निर्णय घेताना सुस्पष्ट विचारांनी काम करावे. तुम्ही सहजतेने आणि तातडीने अनेक मुद्द्यांव यशस्वी उपाय योजाल. आज तुम्ही यशाच्या शिखरावर पोहोचण्याचा प्रयत्न करावा.
कन्या राशीला मिळेल यश
तुमच्या क्षेत्रात तेजीने बदल होत आहेत. नवीन संधी समोर येतील. यश मिळवण्यासाठी तुम्ही हरएक प्रकारे प्रयत्न केले पाहिजेत. तुम्ही स्वतःला वेदना देत आहात, तसेच स्वतःच्या भावनाही लपवत आहात. कार्यस्थळी आव्हानांचा लाभ उठवा.
तूळ राशीच्या लोकांना व्यवसायात लाभ
तुमच्या समोर जीवनाचा एक कोरा कॅनव्हास आहे आणि त्यावर तुम्हाला चित्र काढायचे आहे. भूतकाळातील गोष्टी आता संपत आहेत, आणि नवीन कालखंड सुरू होत आहे. व्यवासायिक योजन पूर्ण झाल्याने तुम्हाला तणावमुक्त वाटेल. नवीन संधींचा सामना करण्यास तयार राहा
वृश्चिक राशीच्या लोकांनी खर्च टाळावेत
आज लोकांच्या गर्दीत तुम्ही तुमचा ठसा उमटवाल. वैयक्तिक आणि व्यावसायिक विषयात ऊर्जावान राहात, स्वतःच्या धाडसाचा परिचय द्या. आज तुम्हाला काही अशक्य वाटणाऱ्या कामांचा सामना करावा लागेल, आणि तुम्ही यावर उपाय करूनच उसंत घ्याल. खुलून खरेदी केल्याने तुमचे मासिक बजेट बिघडून जाईल. तुमची मूल्यं आणि सिद्धांत यावर अमल कार. स्वतःबद्दल प्रामाणिक राहा.
धनू राशीच्या लोकांनी कार्यक्षेत्रात विचारपूर्वक निर्णय घ्यावा
जीवन तुमच्यासमोर ज्या घटना सादर करत आहे, त्याचा आनंद घ्याव, तरच तुम्हाला भूतकाळातून काही शिकता येईल आणि नकारात्मक विचारांना विसरून जाल. आज तर तुम्ही नकारात्मक विचार दूर केले नाही तर तुम्ही भावनिक दृष्ट्या दुःखी व्हाल. कार्यस्थळी अक्कलहुशारीने निर्णय घ्यावेत.
मकर राशीच्या लोकांना कामाच्या नव्या संधी मिळतील
आज तुमच्या दृष्टिकोनात नाविन्य येईल. आज तुम्ही बदलाच्या महत्त्वपूर्ण टप्प्यावर आहात. आज खोलात जाऊन विचार करा आणि कार्यस्थळी येत असलेल्या आव्हांना पार करू शकाल. जास्त भावनिक होऊ नका. कार्यस्थळी तुम्हाला नव्या संधी मिळतील, याचा तुम्ही विचारपूर्वक वापर करा. भावनिक होऊन निर्णय घेऊ नका.
कुंभ राशीच्या लोकांनी नोकरीत नवा विचार करावा
तुम्ही भूतकाळातील घटना आणि भविष्य काळातील नियोजन यांचा विचार करत वर्तमानात जगत आहात. तुम्ही प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्याल. जर तुम्ही सावध राहिला नाही तर तुमच्या हातून एखादी सूवर्णसंधी निसटू शकेत किंवा एखाद्या चांगल्या वैयक्तिक अनुभवाला मुकाल. नोकरीत नव्या संधी मिळाल्या तर तुम्हाला त्यावर विचार करावा लागेल.
मीन राशींना ओळखीतून व्यावसायिक डील मिळेल
लोकांशी संवाद प्रस्थापित करण्याची ही वेळ आहे. व्यावसायिक आणि रचनात्मक क्षेत्राशी संबंधित लोकांसोबत संपर्क प्रस्थापित करावे लागतील. आपण सर्वच लोक अस्तित्वाच्या एका चमत्काराचे अंग आहोत, त्यामुळे हिनता आणि श्रेष्ठता या विषयात पडायची गरज नाही. व्यावसायिक आणि खासगी विषय तुम्ही विलक्षणरीत्या आणि रचनात्मक पद्धतीने मार्गी लावाल.