Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Rahul Gandhi Big Challenge: लिहून ठेवा, मी गुजरातमध्ये तुमचा पराभव करणार; लोकसभेत राहुल गांधींचे भाजपला ओपन चॅलेंज
गुजरातमध्ये पराभव करणार
सरकारवर टीका करताना राहुल गांधी म्हणाले, इनकम टॅक्स, ईडी हे सर्व लहान उद्योगपतींच्या मागे लागतात. ज्यामुळे कोट्यवधींची मालमत्ता असलेल्यांचा मार्ग मोकळा होतो. मी गुजरातमध्ये होतो तेव्हा टेक्सटाइल इंडस्ट्रीमधील लोकांनी सांगितले की मोठ्या उद्योगपतींचा मार्ग मोकळा करण्यासाठी जीएसटी आणले गेले. यावर सभागृहातील एका सदस्याने राहुल गांधींना तुम्ही कधी गुजरातमध्ये जाता का? असा सवाल केला. त्यावर राहुल गांधींनी उत्तर दिले- मी जातो. एवढ्या उत्तरावर ते थांबले नाही तर पुढे म्हणाले की, यावेळी आम्ही गुजरातमध्ये तुमचा पराभव करू, लिहून ठेवा यावेळी आम्ही (इंडिया आघाडी) गुजरातमध्ये तुमचा पराभव करू.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला गुजरातमध्ये क्लीन स्वीप करता आला नव्हता. २०१४ आणि २०१९ मध्ये भाजपने राज्यातील सर्व २६ जागांवर विजय मिळवला होता. यावेळी काँग्रेसने बनासकांठा जागेवर विजय मिळवला. यावेळी गुजरातमध्ये काँग्रेस आणि आप यांनी एकत्र निवडणूक लढवली होती. काँग्रेसला ३१.२४ टक्के तर भाजपला ६१.८६ टक्के मते मिळाली.
शेतकऱ्यांशी बोलत नाही…
शेतकऱ्यांबद्दल बोलताना राहुल गांधी म्हणाले, आम्ही भूमि अधिग्रहण विधेयक तयार केले होते. ज्यामुळे त्यांना योग्य मोबदला मिळाला असता. पण त्याला तुम्ही रद्द केले. शेतकऱ्यांना घाबरवण्यासाठी तुम्ही ३ विधेयके आणली. पंतप्रधान म्हणाले की ही विधेयके शेतकऱ्यांच्या फायद्याची आहेत. पण प्रत्यक्षात त्याचा फायदा अंबानी आणि अदानी यांना होणार होता. शेतकरी रस्त्यावर आले पण तुम्ही त्यांच्याशी चर्चा केली नाही. तुम्ही त्यांना दहशतवादी म्हणता, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.
अग्निवीर- वापरा आणि फेकून द्या…
अग्निवीर योजनेवर बोलताना राहुल गांधी म्हणाले, मी एका अग्निवीर कुटुंबाला भेटलो. लहान घर होते. घरातील अग्निवीर शहीद झाला होता. मी त्याला शहीद मानतो, पण नरेंद्र मोदी त्याला शहीद मानत नाहीत. त्याच्या कुटुंबियांना पेन्शन मिळणार नाही. साधारण जवानाला पेन्शन मिळणार. सरकार साधारण जवानाची मदत करणार पण अग्निवीरच्या जवानाला नाही. अग्निवीर म्हणजे वापरा आणि फेकून द्या. तुम्ही जवानांमध्ये फुट पाडत आहात आणि स्वत:ला देशभक्त असल्याचे सांगता. ही कसली देशभक्ती? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.