Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

T20 World Cup विजयाचं सेलिब्रेशन जीवावर बेतलं, ग्लासमध्ये टाकून फटाके फोडले आणि… हसत्या खेळत्या कुटुंबावर शोककळा

8

जबलपूर : भारताने टी२० वर्ल्डकपवर आपलं नाव कोरलं. २९ जून रोजी झालेल्या टी२० वर्ल्डकपच्या शेवटच्या सामन्यात भारताच्या विजयानंतर देशभरात जल्लोष केला गेला. अनेकांनी रस्त्यावर उतरत वाजत, नाचत, फटाके फोडत भारताने वर्ल्डकप जिंकल्याचा आनंद साजरा केला. अख्ख्या देशभरात भारतीय संघाने तब्बल १७ वर्षांनी केलेल्या कामगिरीचं कौतुक होत त्याचा आनंद, सेलिब्रेशन केलं होतं. मात्र भारताच्या विजयाचं हे सेलिब्रेशन करणं एका चिमुकल्याच्या जिवावर बेतलं आहे. काही मुलांकडून केली गेलेली मस्ती चिमुकल्याच्या निधनाचं कारण ठरली आहे. काही मुलांनी विचित्र पद्धतीने फोडलेल्या फटाक्यांमुळे ५ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे.

भारत आणि दक्षिण अफ्रिकेदरम्यान खेळल्या गेलेल्या वर्ल्डकप टी२० च्या शेवटच्या सामन्यात भारताने विजयाची मोहोर उमटवली आणि त्यानंतर संपूर्ण देशभरात एकच जल्लोष झाला. या सेलिब्रेशनवेळी अनेक ठिकाणी फटाके फोडून आनंद साजरा करण्यात आला. जबलपूरमध्येही असाच आनंद साजरा करण्यात आला, मात्र या आनंदावर काही वेळात शोककळा पसरली. काही मुलांची मस्ती एका चिमुकल्याच्या जीवावर बेतली.
Electric Bill : घरात २ पंखे आणि ३ बल्ब… मजुराला ३१ लाखांचं बिल, पैसे न भरल्याने विजही कापली; कुटुंब हैराण
जबलपूरमधील बधैया इथे काही मुलं भारताच्या विजयानंतर फटाके फोडत होते. पण त्यांची फटाके फोडण्याच्या मस्तीने एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. बधैया या परिसरात राहणारी काही मुलं फटाक्यांवर स्टीलचा ग्लास ठेवून फटाके फोडत होती. ग्लासमध्ये फटाका फुटल्यानंतर ग्लासचे तुकडे होऊन ते हवेत पसरले. हे तुकडे बाजूला उभ्या असलेल्या पाच वर्षीय चिमुकल्या दीपक ठाकूरला लागले. ग्लासचे तुकडे लागल्याने तो चिमुकला जागेवरच कळवळू लागला. इतकंच नाही तर ग्लासचा तुकडा त्याच्या पोटात गेला होता. तो वेदनेने विव्हळत होता. एकीकडे जल्लोष सुरू असताना त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान चिमुकल्याचा मृत्यू झाला.

या घटनेनंतर चिमुकल्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. आनंदाच्या भरात केलेल्या मस्तीने त्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. घटनास्थळी पोलीस पोहोचले त्यानंतर त्यांनी चौकशी करत पुढील तपास सुरू केला आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.