Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Kalki 2898 AD पहिल्या सोमवारी पास की नापास? पाचव्या दिवशी कमावला इतक्या कोटींचा गल्ला

10

मुंबई: गेल्या काही महिन्यांपासून भारतातील बॉक्स ऑफिस बड्या हिटच्या प्रतीक्षेत होते. सुरुवातीला बॉक्स ऑफिसवर ‘शैतान’, ‘आर्टिकल ३७०’ ने बऱ्यापैकी चांगली कामगिरी केली. त्यानंतर गेल्या महिन्यात आलेला ‘मुंज्या’ १०० कोटी क्लबमध्ये जाणारा यावर्षातील पहिला सिनेमा होता. आता ‘कल्की २८९८ एडी’ने बॉक्स ऑफिस काबीज केले असून रीलिज झाल्यानंतरच्या पहिल्या सोमवारीही सिनेमाची कमाई कोट्यवधींच्या घरात होती.पहिल्याच वीकेंडपर्यंत ‘कल्की २८९८ एडी’ने जगभरात ५०० कोटींच्या जवळपास बंपर कलेक्शन केले. भारतासह परदेशातही प्रभास-दीपिका पादुकोणच्या सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. ३० जून रोजी रविवारी सिनेमाने ८८.२ कोटींची जबदरस्त कमाई केली. यानंतर येणाऱ्या पहिल्या सोमवारच्या परीक्षेतही हा चित्रपट पास होणार असल्याचे चित्र आहे. जाणून घ्या आतापर्यंत या चित्रपटाने किती कोटींचा गल्ला जमवला आहे.

मंडे टेस्टमध्ये ‘कल्की २८९८ एडी’ पास की नापास?

Sacnilk ने दिलेल्या रिपोर्टनुसार सर्व भाषांमध्ये २७ जून रोजी पहिल्या दिवशी या चित्रपटाने ९५.३ कोटी कमावले, दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी अनुक्रमे ५९.३ कोटी आणि ६६. कोटी एवढी कमाई झाली. रविवारी चौथ्या दिवशी हा आकडा ८८.२ कोटींवर पोहोचला होता. तर पाचव्या दिवशी सोमवारी (०१ जुलै २०२४) संध्याकाळपर्यंत २२.४५ कोटींची कमाई झाली आहे. यामध्ये रात्रीच्या शोचे आकडे जोडले गेल्यानंतर सोमवारी नेमकी किती कमाई झाले हे समोर येईल. मंडे टेस्टमध्ये हा सिनेमा पास होईल का हे तेव्हाच स्पष्ट होईल. आतापर्यंत भारतात ३३१.४५ कोटी रुपयांची कमाई झाली आहे.

Ketaki Chitale: ‘हिंदू राष्ट्राला तुम्ही भगवा दहशतवाद म्हणता, मग हे चालतं का?’ राहुल गांधींवर भडकली केतकी चितळे

तेलुगू भाषेत सर्वाधिक कमाई

सॅकनिल्कने ही आकडेवारी दिली आहे. ‘कल्की २८९८ एडी’ची सर्वाधिक कमाई तेलुगू भाषेत झाली. तेलुगूसह हा सिनेमा तामिळ, हिंदी, कन्नड आणि मल्याळम भाषेत जगभरात प्रदर्शित झाला आहे.

नाग अश्विन दिग्दर्शित या चित्रपटात प्रभास-दीपिकासह अमिताभ बच्चन, कमल हासन, दिशा पाटनी, दुलकर सलमान, शाश्वत चॅटर्जी अशी तगडी स्टारकास्ट आहे. सिनेमात अनेकांची सरप्राइज एन्ट्रीही पाहायला मिळाली. याशिवाय सोशल मीडियावर ‘कल्की २८९८ एडी’विषयी संमिश्र प्रतिक्रियाही समोर येत आहेत.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.