Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Realme C63: 9 हजारांमध्ये आयफोन सारखा फोन; फ्लिपकार्टवरून होईल विक्री

9

Realme C63 स्मार्टफोन भारतात लाँच झाला आहे. हा कंपनीचा लेटेस्ट बजेट स्मार्टफोन आहे. फीचर्स पाहता, रियलमीच्या फोनमध्ये 6.74 इंचाचा HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच, Unisoc T612 प्रोसेसरसह आला आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 50MP चा रियर कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फी व व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 8MP चा फ्रंट कॅमेरा मिळतो. फोनची बॅटरी 5000mAh ची आहे, त्याचबरोबर फास्ट चार्जिंगचा सपोर्ट मिळतो. चला जाणून घेऊया या फोनची किंमत, उपलब्धता आणि स्पेसिफिकेशन संबंधित सर्व माहिती.

Realme C63ची किंमत

Realme C63 भारतात 4GB RAM व 128GB स्टोरेजसह आला आहे. याव्यतिरिक्त कोणताही व्हेरिएंट बाजारात आला नाही. या फोनची किंमत 8,999 रुपये आहे. फोन Leather Blue आणि Jade Green अश्या दोन कलरमध्ये सादर करण्यात आला आहे. हा फोन Realme.com आणि Flipkartच्या माध्यमातून विकत घेता येईल. फोनची विक्री 3 जुलै दुपारी 12 वाजल्यापासून सुरु होईल.

Realme C63चे स्पेसिफिकेशन्स

स्पेसिफिकेशन पाहता, रियलमी सी63 फोनमध्ये 6.74 इंचाचा HD+ LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 90Hz आहे. डिस्प्लेची मॅक्सिमम ब्राइटनेस 450 Nits की आहे. तसेच, हा फोन Unisoc T612 प्रोसेसरसह आला आहे, जोडीला 4GB RAM व 4GB व्हर्च्युअल RAM चा सपोर्ट मिळतो. म्हणजे एकूण 8 जीबी रॅमची ताकद हा फोन गरज पडल्यास देऊ शकतो.

फोनची स्टोरेज 128GB आहे. जी मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 2TB पर्यंत वाढवता येते. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 50MP चा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच, सेल्फी व व्हिडीओ कॉलिंगसाठी 8MP चा फ्रंट कॅमेरा मिळतो. फोनची बॅटरी 5000mAh ची आहे, त्याचबरोबर 45W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट देण्यात आला आहे.

हा फोन Android 14 आधारित realme UI वर चालतो. सिक्योरिटीसाठी फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरफ्रिंट सेन्सर आहे. फोनचे डायमेंशन 167.26×76.67×7.74mm आणि वजन 189 ग्राम आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.