Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
कोकण विभाग पदवीधर मतदारसंघात निरंजन वसंत डावखरे १ लाख ७१९ मते मिळवून विजयी – विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी, पी.वेलरासू
नवी मुंबई, दि. 01:- विधान परिषदेच्या कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाच्या व्दिवार्षिक निवडणुकीची मतमोजणी आज नेरुळ येथील आगरी कोळी संस्कृती भवन येथे शांततेत पार पडली. मतमोजणीसाठी एकूण 42 टेबल ठेवण्यात आले होते. या निवडणुकीत एकूण 1 लाख 43 हजार 297 मतदारांनी मतदान केले होते. त्यापैकी 1 लाख 32 हजार 071 मते वैध ठरली तर 11 हजार 226 मते अवैध ठरली. जिंकून येण्यासाठी 66 हजार 036 इतक्या मतांचा कोटा ठेवण्यात आला.
उमेदवारांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे
1) निरंजन वसंत डावखरे, भारतीय जनता पार्टी :- 1 लाख 719
2) कीर रमेश श्रीधर, इंडियन नॅशनल काँग्रेस :- 28 हजार 585
3) विश्वजित तुळशीराम खंडारे, भीमसेना :- 536
4) अमोल अनंत पवार, अपक्ष :- 200
5) अरुण भिकण भोई (प्राचार्य),अपक्ष :- 310
6) अक्षय महेश म्हात्रे, अपक्ष :- 302
7) गोकुळ रामजी पाटील, अपक्ष :- 424
8) जयपाल परशूराम पाटील, अपक्ष :- 64
9) नागेश किसनराव निमकर,अपक्ष :- 215
10) प्रकाश वड्डेपेल्ली, अपक्ष :- 33
11) मिलिंद सिताराम पाटील, अपक्ष :- 208
12) ॲड. शैलेश अशोक वाघमारे, अपक्ष :- 334
13) श्रीकांत सिध्देश्वर कामुर्ती, अपक्ष :- 141
पहिल्या पसंतीची 1 लाख 719 मते मिळवून जिंकून येण्यासाठी कोटा पूर्ण केलेले उमेदवार निरंजन वसंत डावखरे हे कोकण विभाग पदवीधर मतदार संघातून निवडून आले असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त पी. वेलरासू यांनी जाहीर केले.