Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

अरेरे! पाचव्या दिवशी ‘कल्की’चा फ्लॉप शो, प्रेक्षकांची सिनेमाकडे पाठ? इतकीच झाली कमाई

9

मुंबई– नाग अश्विन दिग्दर्शित तसेच तगडी स्टार कास्ट असलेला कल्की 2898 एडी हा सिनेमा जूनच्या २७ तारखेला प्रदर्शित झाला. आत या सिनेमाला रिलीज होऊन आठवडा उलटेल. पाच भाषांमध्ये प्रदर्शित झालेल्या या सिनेमाचा आलेख कधी चढत्या तरी कधी उतरत्या क्रमात पाहायला मिळतो.पहिल्या दिवशी ज्या आकड्यांवर या सिनेमाने खाते चालू केले होते ते आकडे या चार दिवसांत पुन्हा परतलेले दिसत नाही.शिवाय पाचव्या दिवशी तर सिनेमाची अवस्था फारच वाईट होती. मात्र असे असूनही ६ व्या दिवशी हा सिनेमा जगभरात ६०० कोटींचा आकडा पार करेल असे वाटते.

Premachi Goshta 2 July: बछड्याची वाघीण बनत मुक्ताचं रौद्र रुप, सावनीही घाबरली! आई म्हणजे काय? सुंदर शब्दात वर्णन
‘कल्की 2898 एडी’ सिनेमाने पहिल्या रविवारी म्हणजेच रिलीजच्या चौथ्या दिवशी देशभरात एकूण ८८.२० कोटी रुपयांची कमाई केली होती. हिंदीमध्ये या सिनेमाने ४० कोटी, तामिळमध्ये ५.५ कोटी, तेलगूमध्ये ३८.८ कोटी, कन्नडमध्ये ०.७ कोटी आणि मल्याळममध्ये ३.२ कोटी रुपये कमावले. पण पहिल्या सोमवारी म्हणजेच पाचव्या दिवशी त्यात ६०.७७ % ची घसरण कमाईत दिसून आली.

Harshada Khanvilkar: लॉ कॉलेजने काढून टाकलं, शिक्षण अर्धवट सोडल्याने आईचा ६ महिने अबोला; नीना गुप्तांनी दिला करिअरसाठी ब्रेक
पाचव्या दिवशी कल्किची कमाई

Sacnik दिलेल्या माहितीनुसार, कल्की 2898 AD ने पाचव्या दिवशी देशात एकूण ३४.६ कोटी रुपये कमावले. त्यात तेलुगूमध्ये १४.५ कोटी, तामिळमध्ये २ कोटी, हिंदीमध्ये १६.५ कोटी, कन्नडमध्ये ०.३ कोटी आणि मल्याळममध्ये १.३ कोटी रुपये बॉक्स ऑफिसवर कमावले आहे. तुलनेत पाचव्या दिवशीची कमाई चौथ्या दिवसापेक्षा खूपच कमी झालीय. कदाचित हे वीक डेज असल्यामुळे होऊ शकते. त्यामुळे येत्या वीकेंडकडून सिनेमाला खूप अपेक्षा आहेत.

जगभरातही सारखीच परिस्थिती

प्रभास, अमिताभ बच्चन, कमल हासन, दीपिका पदुकोण यांच्या या सिनेमाने चौथ्या दिवशी भारतात ३०९ कोटी रुपयांचे कलेक्शन केले तर जगभरात ५१९ कोटींची कमाई झाली. पाचव्या दिवशी भारतात एकूण ३४३ कोटी रुपये कमावले तर जगभरात ५५५ कोटी रुपयांवर हा आकडा पोहचला. ६०० कोटींच्या बजेटमध्ये बनलेला हा सिनेमा ८५०० स्क्रीन्सवर रिलीज झाला आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.