Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

MP Zartaj Gul : अध्यक्ष महोदय, माझ्या डोळ्यात डोळे घालून पाहा, संसदेतील व्हिडिओ झाला व्हायरल

10

Pakistani Sansad Viral Video : पाकिस्तानच्या संसदेच्या एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर बराच व्हायरल होतोय. पाकिस्तानच्या संसदेतील मजेशीर क्षण याआधीसुद्धा अनेकदा व्हायरल झालेत आणि लोकांच्या पंसतीस सुद्धा उतरलेत पण यावेळी महिला खासदाराच्या अजब गजब मागणीने सारेच चक्रावले इतकेच नव्हे तर खुद्द संसदेचे अध्यक्षांनी महिला खासदाराची मागणी फेटाळून लावली. व्हिडिओमध्ये दिसते महिला खासदार उभी राहते आणि ती संसदेच्या अध्यक्षांना म्हणते माझ्या डोळ्यात बघा आणि माझे बोलणे ऐका अशी अजब गजब मागणी महिला खासदाराने केली, हे पाहून संसदेत सारेच चक्रावले, खुद्द संसदेचे अध्यक्ष सुद्धा गोंधळले.

नेमके काय घडले?

संसेदेचे अधिवेशन नेहमीप्रमाणे सुरु होते. खासदार आपले आपले मतदारसंघातील प्रश्न मांडत होते दरम्यान महिला खासदार जरताज गुल यासुद्धा प्रश्न विचारण्यासाठी उभ्या राहिल्या पण बोलणे सुरु करण्याच्या आधी संसदेच्या अध्यक्षांना त्यांनी विनंती केली “की तुम्ही कृपया माझ्या डोळ्यात डोळे घालून माझा प्रश्न ऐका” हे ऐकल्यानंतर संसदेत काही काळ संभ्रमाची परिस्थिती झाली. सारेच अशी अजब मागणी ऐकून हसू लागले. यावर अध्यक्षांनी मात्र ही अट फेटाळली. अध्यक्ष म्हणाले तुम्ही एक महिला खासदार आहात त्यामुळे महिला खासदारांच्या डोळ्यात डोळे घालून मी पाहू शकणार नाही असे म्हणत अध्यक्षांनी मागणी फेटाळली.
Rahul Gandhi : “मी बोलताना कॅमेरा माझ्यावरुन का हटवला जातो” राहुल गांधींचा ओम बिर्लांना सवाल; लोकसभेत गदारोळ

कोण आहेत जरताज गुल?

पूर्व पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांच्या पक्षाची नेत्या जरताज गुल खासदार आहेत. माजी पंतप्रधान इमरान खानच्या कॅबिनेटमध्ये सुद्धा त्या मंत्री होत्या. कोविडमध्ये सुद्धा अशेच वादग्रस्त विधान करुन जरताज गुल चर्चेत होत्या. संसदेत असाच प्रकार केल्याने पुन्हा जरताज चर्चेत आल्या आहेत.

अध्यक्षांनी जरताज गुल यांची मागणी फेटाळल्यानंतरही जरताज गुल म्हणाल्या “माझ्या पक्षाच्या नेत्याने मला शिकवले की समोरच्यासोबत डोळ्यात डोळे घालून पाहा तरच तुम्ही तुमचे म्हणणे समोरच्यापर्यंत नीट पोहोचवू शकाल, म्हणून तुम्ही माझ्या डोळ्यात डोळे घालून पाहा, नाहीतर चष्मा घालून डोळ्यात डोळे घालून पाहा” असा नवा प्रस्ताव जरताज गुल यांनी दिला, पण अध्यक्ष मागणीवर ठाम राहिले आणि त्यांनी महिला खासदाराच्या डोळ्यात डोळे घालून पाहायला थेट नकार दिला.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.