Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Virat Kohli: विराट कोहलीने निवृत्तीनंतर लगेचच केला ‘हा’ नवीन रेकॉर्ड; मैदानाबाहेर रोवला झेंडा

9

टीम इंडिया टी-20 चॅम्पियन बनताच विराट कोहलीने टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. मैदानावर टी-20 मधील तुफान कामगिरीनंतर आता निवृत्तीनंतर विराट कोहलीने आणखी एक विक्रम केला आहे. पण यावेळी हा विक्रम त्याने मैदानावर नाही तर सोशल मीडियावर केला आहे.

भारतातील विराट कोहलीच्या चाहत्यांबद्दल वेगळे काही सांगायची गरज नाही. T20 मध्ये भारताने विश्वचषक जिंकल्यानंतर तर त्याच्या चाहत्यांच्या आनंदाला पारावर उरला नाहीये. याचीच प्रचिती आली ती T20 विश्वचषक विजयानंतर, विराट कोहलीने केलेल्या इंस्टाग्रामवर पोस्ट नंतर. विराट कोहलीने इंस्टाग्रामवर केलेली हि पोस्ट भारतातील आतापर्यंतची सर्वात जास्त पसंत केलेली फोटो पोस्ट बनली आहे!

विराट कोहलीची Instagram Post

विराट कोहलीने भारतीय संघाच्या विजयाचा आनंद साजरा करत एक भावनिक पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये अनेक फोटोंचा कोलाज होता आणि आत्तापर्यंत त्याला 1 कोटी 96 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले होते. कोहलीने या पोस्टमध्ये लिहिले की, “यापेक्षा चांगल्या दिवसाचे स्वप्नही बघू शकलो नसतो. देव महान आहे आणि मी कृतज्ञतेने माझे डोके टेकवतो. अखेर आम्ही हे करून दाखविले. जय हिंद!” या कॅप्शनला देशभरातील क्रिकेट चाहत्यांनी पसंती दिली.
https://www.instagram.com/p/C80EI7NNDFK/?igsh=MXJ3M3hyZmF3MGRneA==https://www.instagram.com/p/C80EI7NNDFK/?igsh=MXJ3M3hyZmF3MGRneA==

या पोस्टचा मोडला रेकॉर्ड

विराट कोहलीच्या या पोस्टपूर्वी, सर्वात जास्त लाईक्स मिळालेला इंस्टाग्राम फोटो म्हणजे बॉलिवूड कपल कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या लग्नाचा फोटो. पण कोहलीच्या पोस्टने हा विक्रम सहज पार केला.

जगविख्यात दिग्ग्जांनीही केल्या कमेंट

कोहलीच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट केल्या. यामध्ये केवळ भारतीय सेलिब्रिटी आणि क्रिकेटपटूच नाही तर परदेशी खेळाडूंचाही समावेश होता. प्रसिद्ध फायटर कोनोर मॅकग्रेगर आणि ब्राझीलचा फुटबॉल स्टार विनिशियस ज्युनियर यांनीही कोहलीचे अभिनंदन केले आहे.

विराट कोहली निवृत्त झाला

भारताला T20 विश्वचषक जिंकून दिल्यानंतर, कोहलीने आता T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली. तो म्हणाला, ‘हा माझा शेवटचा T20 सामना होता जो मी भारतासाठी खेळलो.’ तो पुढे म्हणाला कि, ‘हा विश्वचषक म्हणजे माझ्या टी-20 कारकिर्दीला एक अद्भुत निरोप आहे. आता पुढच्या पिढीने T20 क्रिकेट पुढे नेण्याची वेळ आली आहे.’



Source link

Leave A Reply

Your email address will not be published.