Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

UP Hathras Stamped Death: भोले बाबाच्या सत्संगाने १४०हून अधिक जणांचा जीव घेतला, मृतांमध्ये सर्वाधिक महिला, मुलांचा समावेश

9

हाथरस: उत्तर प्रदेशमध्ये हाथसर येथे सत्संग सुरू असताना झालेल्या चेंगराचेंगरीत मृतांची संख्या १३४ वर पोहोचली आहे. काही माध्यमांनी मृतांचा आकडा १४०च्या पुढे असल्याचा दावा केलाय. मात्र अद्याप अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही. या घटनेत १८ जण जखमी झाले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. हाथसर येथील रतिभानपूर येथे भोले बाबा यांच्या सत्संग कार्यक्रम सुरू होता. सत्संगात मोठ्या संख्येने भक्त आल्याने ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.

हाथसर जिल्हा प्रशासनाने लोकांच्या मदतासाठी हेल्पलाइन नंबर सुरू केले आहेत. 05722227041 आणि 05722227042 या दोन क्रमांकावर फोन करून चौकशी करता येईल असे सांगण्यात आले आहे. दरम्यान या घटनेवर राष्ट्रपती द्रौपती मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधीपक्ष नेते राहुल गांधी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, माजी मुख्यमंत्री मायावती, काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी, समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव आदींनी शोक व्यक्त केला आहे.

भोले बाबाचे सत्संग झाल्यानंतर आरती झाली आणि माघारी येताना रस्त्यावर चिखल होता. ज्यात पाय घसरून काही महिला मुलांसह पडल्या आणि गोंधळ सुरू झाला. लोक एकमेकांच्या अंगावर पडले आणि मागून येणाऱ्या मोठा जमाव खाली पडलेल्या लोकांच्या अंगावरून चालत पुढे जाऊ लागला, असे एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले.

मदत जाहीर

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगींनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी २ लाख रुपये, जखमांनी प्रत्येकी ५० हजार रुपये जाहीर केले आहेत. पंतप्रधान मोदींनी PMNRFमधून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी २ लाख रुपये तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.
Who Is Bhole Baba: पोलीस दलातील नोकरी सोडून सत्संग करणारे भोले बाबा आहेत तरी कोण?हाथरस चेंगराचेंगरीत ७५ हून अधिक जणांचा मृत्यू

हाथसर येथे १०७ तर एटा एटा येथे २७ मृतदेह असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मदत कार्य करणाऱ्या लोकांनी दिलेल्या माहितीनुसार मृतांची संख्या आणखी वाढू शकते. तसेच यामध्ये महिला आणि लहान मुलांची संख्या अधिक आहे.
Hathras Stampede : भोले बाबा सत्संगात चेंगराचेंगरी नेमकी झाली तरी कशी? प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं धक्कादायक कारण

मुख्यमंत्री घटनास्थळी जाणार

राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उद्या म्हणजेच बुधवारी हाथसर येथे जाणार आहेत. स्थानिक प्रशासनाने या कार्यक्रमाच्या आयोजनाकडे केलेले दुर्लक्षामुळे मुख्यमंत्री नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. मुख्यमंत्र्यांनी २४ तासांच्या आत अधिकाऱ्यांकडून अहवाल मागवला आहे. या प्रकरणी जे दोषी असतीस त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.