Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
पीएम मोदी काय म्हणाले
भरसभेत भाषण थांबवत पीएम मोदींनी हाथरस प्रकरणाची दखल घेत हाथरसच्या दुर्घटनेवर चिंता व्यक्त केली तसेच पीएम मोदी यांनी सीएम योगी यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधत परिस्थितीची माहिती घेतली आहे.
शरद पवार काय म्हणाले..
उत्तरप्रदेशच्या हाथरस येथे चेंगराचेंगरी होऊन त्यात तब्बल १०० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी व खेदजनक आहे. या घटनेविषयी सहवेदना व्यक्त करतो. सदर प्रकरणाची सरकारकडून निष्पक्षपणे चौकशी झालीच पाहिजे. अशा आशयाचे ट्वीट शरद पवारांनी केले आहे.
अखिलेश यादव काय म्हणाले..
आम्ही संसदेत असताना आम्हाला हाथरस दुर्घटनेबद्दल माहिती मिळाली, पण प्रश्न हा पडतो की इतकी गर्दी झाली असताना प्रशासन काय करत होते? इतका जणांचा जीव गेला यासाठी प्रशासनसुद्धा जबाबदार आहे, गर्दीसाठी योग्य उपाययोजना करण्यात आली नाही असे मत खासदार अखिलेश यादव यांनी मांडले आहे.
राहुल गांधी काय म्हणाले
झालेली घटना अतिशय दुर्देवी आहे, मृतांच्या परिवारांसोबत माझ्या सहवेदना आहेत. सरकारने जखमींना चांगले उपचार मिळवुन द्यावे..
खासदार डिंपल यादव काय म्हणाल्या
उत्तरप्रदेश सरकारने दोषींवर कडक कारवाई केली पाहिजे तसेच जखमींना लवकर उपचार मिळवून दिले पाहिजेत, यासह दुर्घटनेसाठी सरकार सुद्धा जबाबदार आहे अशी भूमिका त्यांनी मांडली.
असुद्दीन औवेसी काय म्हणाले
हाथरसमधील घटना दुर्देवी आहे. जखमी लवकर बरे व्हावे अशी प्रार्थना करतो. घटना कशी घडली त्याची कारणे काय? राज्य सरकार गर्दीचे नीट नियोजन करु शकले नाही अशी खंत औवेसींनी व्यक्त केली आहे.
या घटनेतील मृतांना दोन लाख तर जखमींना ५० हजारांची मदत केंद्र सरकार पीएम निधीतून करणार आहे.