Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Rajya Sabha Session: उपराष्ट्रपती धनखड यांच्या उपहासात्मक टिप्पणीवर खर्गे भडकले, प्रत्युत्तरात धनखडही बरसले, राज्यसभेत जोरदार खडाजंगी

7

नवी दिल्ली : राज्यसभेत मंगळवारच्या सत्रात उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्यात खडाजंगी झाली. मल्लिकार्जुन खर्गेंनी धनखड यांच्यावर टिप्पणी केल्याने सभापती धनखड यांनी खर्गेंना फटकारले आहे. मंगळवारच्या सत्रात काँग्रेसचे खासदार प्रमोद तिवारी बोलत होते. बोलत असताना सभापती धनखड यांनी त्यांच्या प्रत्येक वाक्यावर आक्षेप घेतला. तिवारींच्या बोलण्याचे समर्थन करण्यासाठी जयराम रमेश उभे राहिले आणि त्यांच्या विधानाचा तर्क सांगू लागले. या गोष्टीवर सभापती धनखड म्हणाले की, जयराम रमेश जी तुम्ही खूप हुशार आहात, खर्गेजींची जागा तुम्ही घ्यायला हवी. हे ऐकताच खर्गे आपल्या जागेवर उभे राहिले आणि त्यांना सुनावले की, तुम्ही मूर्ख आहात का?

पुढे विरोधी पक्षनेते खर्गे यांनी, त्यांना बनवणारे जयराम रमेश किंवा आप नाहीत, तर सोनिया गांधी आहेत, असे देखील नमूद केले. यावर पुन्हा धनखड यांनी त्यांना फटकारले. म्हणाले, ‘तुम्ही प्रत्येक वेळी सभापतींचा असा अपमान करू शकत नाही.’
Akhilesh Yadav Parliamentary Speech : संविधान, सरकारी नोकऱ्या, EVM मशीन राहुल गांधींपाठोपाठ अखिलेश यादव कडाडले

सभागृहात वाद कशावरुन?

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारप्रदर्शनावर मंगळवारी राज्यसभेत चर्चा सुरू होती. यादरम्यान काँग्रेसचे खासदार प्रमोद तिवारी भाषण करत होते. यावेळी त्यांनी ‘आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती खूप कमी असतानाही सरकारने तेलाच्या किमती कमी केल्या नाहीत. पंतप्रधानांनी आपल्या मित्रांच्या फायद्यासाठी हे केले असण्याची शक्यता आहे.’ असे म्हणत मोदी सरकारला घेरले. यावर सभापती जगदीप धनखर यांनी आक्षेप घेतला आणि तुमच्याकडे पुरावा असेल तेव्हाच बोला, असे तिवारींना बजावले. जयराम रमेश आपल्या जागेवर उभे राहिले आणि अध्यक्षांचे विधान खोडत वाद घालू लागले. आणि मग काय धनखड यांनी देखील ‘जयराम रमेश, तुम्ही खूप हुशार आहात, आणि एक गिफ्टेड माणूस आहात तेव्हा तुम्ही तात्काळ खर्गेंची जागा घेतली पाहिजे,’ अशी उपहासात्मक टिप्पणी केली.

तुम्ही प्रत्येक वेळी सभापतींचा अपमान करू शकत नाही. मी काय बोलतोय, ते न समजून घेता तुम्ही अचानक उठून काहीही बोलता. या देशाच्या आणि संसदीय लोकशाहीच्या इतिहासात कधीही या खुर्चीचा याप्रकारे अपमान झालेला नाही. शिष्टाचार शिका. माझ्याकडे खूप संयम आहे, खूप सहनशक्ती आहे, मी रक्ताचा घोटही पिऊ शकतो.

जगदीप धनखड खर्गेंवर बरसले

सभापती आणि विरोधी पक्षनेते यांच्यात खडाजंगी

हे कानावर खर्गे आपल्या जागेवर उभे राहिले आणि राज्यसभा सभापती, विरोधी पक्षनेते यांच्यात खडाजंगीच झाली. सुरुवातीलाच खर्गे यांनी सभापतींवर वर्णवादी असल्याचा गंभीर आरोप केला. आणि जयराम रमेश यांना इंटेलिंजेट बोलत आहात म्हणजे तुम्ही मला मंदबुद्धी समजता का? असा पलटवार देखील केला. यावर धनखड यांनी देखील प्रत्युत्तरात म्हटले की,’खर्गे जी, मी काय बोललो ते तुम्हाला समजलेच नाही. जेवढा मी तुमचा आदर करतो तेवढा तुम्ही एक अंशही केला तर तुम्हाला ते समजेल. मी म्हणालो काय? मी म्हणालो की पहिल्या रांगेत तुमच्यासारखे व्यक्तिमत्व आहे, ज्याला ५६ वर्षांचा अनुभव आहे, जयराम रमेश यांना प्रत्येक पावलावर भाष्य करून तुम्हाला मदत करावीशी वाटते. आता बघा, एक समस्या आहे, ती तुम्हाला सोडवावी लागेल.’

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.