Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
पहिली घटना… २७ ऑगस्ट २००३
महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामध्ये कुंभमेळ्यात पवित्र स्नान करताना झालेल्या चेंगराचेंगरीत ३९ जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेत सुमारे १४० जण जखमी झाले होते.
दुसरी घटना… २५ जानेवारी २००५
महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यामध्ये मांढरदेवी मंदिरात भरलेल्या वार्षिक जत्रेदरम्यान, चेंगराचेंगरी होऊन ३४० भाविकांचा मृत्यू झाला होता, तर शेकडो भाविक जखमी झाले आहेत.
तिसरी घटना… ३ ऑगस्ट २००८
हिमाचल प्रदेशमधील बिलासपूर जिल्ह्यात नैनादेवी मंदिरात चेंगराचेंगरी होऊन १६२ जण ठार झाले होते. या घटनेत ४७ जण जखमी झाले होते.
चौथी घटना… ३० सप्टेंबर २००८
राजस्थानमधील जोधपूर शहरात चामुंडा देवी मंदिरात बॉम्ब ठेवल्याच्या अफवेने उडालेल्या गोंधळामुळे चेंगराचेंगरीत २५० भाविकांचा मृत्यू झाला होता. तर ६० भाविक जखमी झाले होते.
पाचवी घटना… ४ मार्च २०१०
कृपालू महाराज यांनी मोफत अन्न कपडे वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत ६३ जण मरण पावले होते.
सहावी घटना… १४ जानेवारी २०११
केरळच्या इडुक्की जिल्ह्यातील पुलमेडू येथे एका जीपने काही भाविकांना चिरडले होते. त्यानेळी भाविक सैरावैरा पळाले होते. यात १०४ जणांचा मृत्यू झाला होता.
सातवी घटना… ८ नोव्हेंबर २०११
हरिद्वार येथे गंगा नदीच्या काठावर हर-की-पौडी या ठिकाणी झालेल्या चेंगराचेंगरीत २० जणांचा मृत्यू झाला होता.
आठवी घटना… १९ नोव्हेंबर २०१२
पाटणा येथे छट पुजेच्या सोहळ्याकरता तात्पुरता बांधलेला पूल कोसळल्याने लोक घाबरले होते. त्यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत २० जणांचा मृत्यू झाला होता.
नववी घटना… १३ ऑक्टोबर २०१३
मध्य प्रदेशमधील दतिया जिल्ह्यात रतनगड मंदिरात नवरात्रोत्सवामध्ये चेंगराचेंगरी होऊन ११५ जणांनी आपला जीव गमावला होता. तर १००हून अधिक लोक जखमी झाले होते. भाविक ओलांडत असलेला नदीवरील पूल कोसळण्याच्या बेतात आहे, अशी अफवा पसरल्यामुळे निर्माण झालेल्या भीतीतून ही घटना घडली होती.
दहावी घटना… ३ ऑक्टोबर २०१४
पाटणा येथील गांधी मैदानात आयोजिलेल्या दसरा उत्सवाच्या समारोपानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत ३२ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. तर २६ जण जखमी झाले होते.
अकरावी घटना… १४ जुलै २०१५
आंध्र प्रदेशमधील राजमुंद्री येथे पुष्करम उत्सवात भाविकांचे पवित्र स्नान सुरु असताना चेंगराचेंगरीत २७ जणांनी आपला जीव गमावला होता, तर २०हून अधिक जखमी झाले होते.
बारावी घटना… १ जानेवारी २०२२
जम्मु-काश्मीरमधील माता वैष्णोदेवी मंदिरात प्रचंड गर्दीमुळे भाविकांमध्ये चेंगराचेंगरी होऊन १२ जणांचा मृत्यू तर १२हून अधिक लोकं जखमी झाले होते.
तेरावी घटना… ३१ मार्च २०२३
इंदूरमध्ये रामनवमीनिमित्त मंदिरात हवनाचा कार्यक्रम होत असताना भाविक विहिरीवर बांधलेल्या स्लॅबवर उभे होते. हा स्लॅब कोसळून ३६ जणांचा मृत्यू झाला होता.