Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
हा फोटो संजनाने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकॉऊंटवर व्हिडीओ स्वरूपात पोस्ट केला होता. या व्हिडीओमध्ये जसप्रीत बुमराहसह त्यांचा मुलगा अंगद देखील होता.
एका युजरने फेक हॅन्डलवरून X वर एक फोटो पोस्ट केला होता आणि लिहिले होते, “Best feeling in the world!”
याला उत्तर देताना संजना गणेशनने मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर लिहलं आहे की, “ही चोरलेली ओळख आणि कंटेन्ट आहे. मी हे अकॉऊंट रिपोर्ट केलं आहे, पोस्ट काढून टाकावी अन्यथा मला कायदेशीर कारवाई करावी लागेल.”
संजनाने टी-ट्वेन्टी वर्ल्ड कपमध्ये ICC साठी प्रेझेन्टर म्हणून काम केले होते. जसप्रीत बुमराहच्या कामगिरीचे कौतुक करत तिने एक इंस्टग्राम पोस्ट देखील शेयर केली आहे.
https://www.instagram.com/p/C82BiI_pK2m/?igsh=a2pjcDQxbHR2dzYzhttps://www.instagram.com/p/C82BiI_pK2m/?igsh=a2pjcDQxbHR2dzYz
जसप्रीत बुमराहला यंदाच्या टी-ट्वेन्टी वर्ल्ड कप मधील कामगिरीसाठी प्लेयर ऑफ द टूर्नामेंटचा खिताब देण्यात आला आहे. त्याने या स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघांसाठी खेळताना 8 सामन्यांमध्ये 15 विकेट घेतले आहेत. विशेष म्हणजे तो या स्पर्धेतील सर्वात कमी इकॉनॉमी असलेला मध्ये गोलंदाज ठरला आहे.
साऊथ आफ्रिकेच्या क्रिकेट संघासोबत झालेल्या अंतिम सामन्यात देखील त्याने 20 धावा देऊन 3 विकेट मिळवले होते. भारताने अंतिम सामना 7 रन्सनी सामना जिंकून विश्वचषकावर आपलं नाव कोरलं. आता जसप्रीत बुमराह आणि इतर काही वरिष्ठ खेळाडूंना झिम्बाबे विरोधातील मालिकेत विश्रांती देण्यात आली आहे.
विराट कोहलीचीच्या इंस्टाग्राम पोस्टने केला विक्रम
विराट कोहलीने विश्वचषकाचा विजय साजरा करण्यासाठी एक पोस्ट इंस्टाग्रामवर केली आहे. या पोस्टला विक्रमी लाइक्स मिळाल्या आहेत. विराटने पोस्ट केलेल्या फोटोंच्या कोलाजला आत्तापर्यंत 1 कोटी 96 लाखांहून जास्त लाईक्स मिळाल्या आहेत. याआधी जेव्हा बॉलिवूडमधील कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्या फोटोवर लाइक्सचा पाऊस पडला होता. विराटने त्या पोस्टला सहज मागे टाकले आहे.