Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Infinix Smart 8 Plus: 8 हजारांमध्ये मिळतेय 6000mAh ची दमदार बॅटरी; कॅमेरा आहे जबरदस्त

14

Infinix नं भारतात Smart सीरीजमध्ये नवीन बजेट स्मार्टफोन Infinix Smart 8 Plus लाँच केला आहे. या फोनमध्ये 6.6 इंचाचा एचडी+ डिस्प्ले, 6000एमएएचची बॅटरी आणि एलईडी फ्लॅशसह 8 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. इथे आम्ही तुम्हाला Infinix Smart 8 Plus च्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्ससह किंमतीची माहिती देणार आहोत.

Infinix Smart 8 Plus ची किंमत

Infinix Smart 8 Plus ची किंमत 7,799 रुपये आहे. हा स्मार्टफोन फ्लिपकार्टवर 9 मार्च दुपारी 12 वाजल्यापासून विक्रीसाठी उपलब्ध होईल. एक्सचेंज ऑफरसह फोनची प्रभावी किंमत 6,999 रुपये होईल. हा स्मार्टफोन Galaxy White, Shiny Gold आणि Timber Black कलर्स मध्ये उपलब्ध आहे. Realme C63: 9 हजारांमध्ये आयफोन सारखा फोन; फ्लिपकार्टवरून होईल विक्री

Infinix Smart 8 Plus चे स्पेसिफिकेशन्स

Infinix Smart 8 Plus मध्ये 6.6 इंचाचा IPS LCD डिस्प्ले आहे, ज्याचे रेजॉल्यूशन 1612 x 720 पिक्सल, 1500:1 कंट्रास्ट रेशियो, 180Hz टच सॅम्पलिंग रेट आणि 90Hz रिफ्रेश रेट आहे. हा स्मार्टफोन 2.2Ghz ऑक्टा-कोर MediaTek Helio G36 12nm प्रोसेसरसह आहे, त्याचबरोबर IMG PowerVR GE8320 @ 680MHz GPU देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइड 13 GO एडिशन वर आधारित XOS 13 सह येतो. सेफ्टीसाठी एक साइड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे. या फोनमध्ये 6,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

कॅमेरा सेटअप पाहता या स्मार्टफोनच्या मागे 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि AI लेन्स देण्यात आली आहे. तसेच फ्रंटला 8 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. हा स्मार्टफोन 4GB LPDDR4X RAMसह आला आहे, त्याचबरोबर 4GB अतिरिक्त व्हर्च्युअल रॅमच्या माध्यमातून वाढवता येतो. तसेच 128GB eMMC 5.1 इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे, जी मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 2TB पर्यंत वाढवता येते. कनेक्टिव्हिटीसाठी ड्युअल 4G VoLTE, वाय-फाय 802.11 ac, ब्लूटूथ 5.0, GPS + GLONASS, यूएसबी टाइप सी पोर्ट आणि 3.5 मिमी हेडफोन जॅकचा समावेश आहे. डायमेंशन पाहता फोनची लांबी 163.6 मिमी, रुंदी 75.6 मिमी, जाडी 8.5 मिमी आणि वजन 189 ग्राम आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.