Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Moto Razr 50 Ultra 5G: दोन-दोन डिस्प्ले असलेला मोटोरोलाचा फोन आला भारतात; सोबत 10 हजारांचं गिफ्ट मोफत

16

Moto Razr 50 Ultra 5G गेल्या महिन्यात चीनमध्ये लाँच करण्यात आला होता. आता हा फ्लिप फोन भारतीय बाजारात सादर करण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये Clamshell डिजाइन देण्यात आली आहे. टॉप फीचर्स पाहता, Motorola च्या नवीन फ्लिप फोनमध्ये Moto AI, जेस्चर कंट्रोल आणि pOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. या हँडसेटमध्ये Qualcomm चा पावरफुल प्रोसेसर मिळतो. तसेच, हँडसेटमध्ये 50MP चा कॅमेरा देखील आहे, ज्यामुळे चांगले फोटोज क्लिक करता येतात.

Moto Razr 50 Ultra 5G चे स्पेसिफिकेशन्स

Moto Razr 50 Ultra 5G मध्ये 6.9 इंचाचा इनर pOLED डिस्प्ले आहे. याचे रिजोल्यूशन 1,080×2,640 पिक्सल आहे. याची कव्हर स्क्रीन 4 इंचाची आहे. हे दोन्ही 120Hz रिफ्रेश रेटवर चालतात. यांची पिक्सल डेन्सिटी 417ppi आहे. यात क्वॉलकॉमचा Snapdragon 8s Gen 3 प्रोसेसर आणि 12GB पर्यंत LPDDR5X RAM देण्यात आला आहे. फोनमध्ये 512GB पर्यंतची इंटरनल स्टोरेज मिळते. सिक्योरिटी डिव्हाइसमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक फीचर देण्यात आलं आहे.

या डिव्हाइसमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्यात 50MP चा प्रायमरी सेन्सर आहे, जो ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायजेशनला सपोर्ट करतो. त्याचबरोबर 50MP ची टेलीफोटो लेन्स देखील आहे. तसेच, सेल्फीसाठी हँडसेटमध्ये 32MP चा कॅमेरा मिळतो. या फोनमध्ये Magic Eraser, Photo Unblur आणि Portrait light सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

Moto Razr 50 Ultra मध्ये 4000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. जी 44W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. यात 15W वायरलेस चार्जिंगचा सपोर्ट देण्यात आला आहे. यात 5G, वाय-फाय, जीपीएस, एनएफसी आणि यूएसबी टाईप-सी पोर्ट मिळतो. या मोबाइलचे फोन वजन 189 ग्राम आहे.

मोटो रेजर 50 अल्ट्राची किंमत

मोटो रेजर 50 अल्ट्रा 5जी ची किंमत 99,999 रुपये ठेवण्यात आली आहे. या किंमतीत 12GB+512GB स्टोरेज व्हेरिएंट मिळेल. हा खरेदी करणाऱ्या ग्राहकांना 10 हजार रुपयांची सूट आणि मोफत Moto Buds Plus इअरबड्स मोफत मध्ये मिळतील, ज्यांची किंमत 9,999 रुपये आहे. हा हँडसेट 10 जुलैपासून प्री-बुक करता येईल.

लवकरच येत आहे हा डिवाइस

G-सीरीजच्या नवीन डिवाइस Moto G85 5G ची लाँच डेट अनाउंस झाली आहे. हा डिवाइस 10 जुलै 2024 लाँच केला जाईल. या फोनमध्ये 6.7 इंचाचा एफएचडी प्लस डिस्प्ले मिळेल. याचा रिफ्रेश रेट 120Hz असेल. तसेच Snapdragon 6s Gen 3 चिपसेट, 256GB पर्यंत इंटरनल स्टोरेज मिळेल. हा मिड रेंजमध्ये लाँच केला जाऊ शकतो.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.